अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११


बुवाबाजी एक अंधश्रद्धा समाजात बाबागिरी कशी चालते. कोणत्या पद्धतीने चालते याचे अतिशय सुदंर उदाहरण  ''शहाणपण देगा देवा '' या मराठी सिनेमातील या गाण्यातून आपल्याला पहायला मिळते अतिशय छान पद्धतीने यात बुवाबाजीची मांडणी करण्यात आलेली आहे . 




समाजात बाबागिरी कशी चालते.
कोणत्या पद्धतीने चालते याचे अतिशय सुदंर उदाहरण 
''शहाणपण देगा देवा '' या मराठी सिनेमातील या गाण्यातून आपल्याला पहायला मिळते
अतिशय छान पद्धतीने यात बुवाबाजीची मांडणी करण्यात आलेली आहे
अंधश्रद्धासोडा देश,बलवान बनवा !!

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

वैज्ञानिक दृष्टिकोन

वैज्ञानिक दृष्टिकोन
कॅप्शन जोडा
बहुधा सगळयाच सुजाण नागरिकांना, भारत या राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात; पण फारसं
कुणालाच हे माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ
प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित
शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा
विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे. पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये विज्ञानाची प्रगती आणि सामाजिक सुधारणा,
बऱ्याच प्रमाणात जोडीनेच झाल्या. आपल्याकडे आधी विज्ञानाची फक्त सृष्टी आली; पण विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी
आवश्यक संधी, आणि योग्य प्रकारचं शिक्षण, यापासून सर्वसामान्य माणूस वंचितच राहिला. आपण 'विज्ञानयुग' आहे
असं म्हणतो, कारण गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षात, विज्ञानाची प्रगती फार प्रचंड वेगानं झाली. त्यातही गेल्या काही
दशकात, इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि नंतर कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे तर, ही वाढ घातांकाच्या श्रेणीने होत आहे.
आज अवकाशात झेप घेऊन, सागरात सूर मारून माणूस शब्दश: त्रिलोकसंचारी झाला आहे. मूलभूत गरजांच्या
पूर्ततेपासून चैनीच्या वस्तूंच्या सहज उपलब्धतेपर्यंत, सगळयाच गोष्टी, विज्ञानामुळेच साध्य आणि शक्य झाल्या आहेत.
व्यक्तिगत परिचर्येपासून सामाजिक स्थैर्यापर्यंत, सर्वच क्षेत्रांत विज्ञानाची प्रगती, तिचं सहज विस्मरण होण्याइतकी झाली;
पण या सगळया प्रगतीबरोबर जी मानसिकता यायला हवी, ती येत नाही. विज्ञानाची प्रगती कुतूहल, चौकसपणा या
गुणांच्या आधारावर सृष्टीची कोडी उलगडण्याच्या प्रयत्नातून झाली; पण ही चिकित्सेची, सत्य शोधण्याची जाणीव काही
रुजलेली दिसत नाही. का, कसं हे कुतूहल नाही, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. मुख्य म्हणजे हा अभाव
सगळीकडेच जाणवतो. तरुणांपासून वृद्धांपर्यंत, घरापासून व्यवसायापर्यंत सगळीकडेच! निरक्षरता किंवा अपुरं शिक्षण, हे
त्याचं कारण नाही, कारण जिथे आपण शिक्षण घेतो, त्या शाळा, कॉलेजांमध्येही, ही चिकित्सेची जाणीव करूनच दिली
जात नाही. माहितीचा साठा आजच्या स्पर्धेच्या युगात हवा हे खरंच; पण कार्यकारणभाव शोधण्याची सवय होणं,
तितकंच गरजेचं आहे. विज्ञान म्हणजे, केवळ जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, एवढंच नाही, तर समाजशास्त्रंही
त्यातच येतात, कारण तिथेही कार्यकारणभाव आणि चिकित्सा लागतेच. म्हणूनच विज्ञान हे आपलं आहे, लोकांचं आहे,
लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं लौकिक आहे, इहलौकिक आहे

शरद वानखेडे 
अकोला महाराष्ट्र 


बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

आपला सहभाग अावश्यक


आपला सहभाग अावश्यक 


शिक्षणाचा प्रसार झाला आणि विज्ञानाचा वापर वाढला कि, अंधश्रधा 

अपोआप दूर होतील असा एक समाज स्वतंत्र्यानंतर रूढ होता. गेल्या काही  वर्षात यातील फोलपणा सर्वांच्या ध्यानात आला आहे .केवळ अशीक्षितांतच नव्हे तर सुशिक्षीतांमधेही दववादाचे व कर्मकांडाचे प्रस्थ वाढत आहे .काही  त्याज्य व अन्यायकारक रूढी - परंपराचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न होत आहेत .अंधश्रद्धांना विज्ञानाचा मुलामा देण्याची दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालू आहेत .मात्र समाजात एक वर्ग असा आहे कि, ज्याला दैववादाचे व  अंधश्रद्धांचे हे प्रस्थ अयोग्य वाटते .याविरोधात कोणी संघर्ष करत आहे असे दिसल्यास मदतीचा हात पुढे करण्यास तो उत्सुक असतो .आपण यापेकी आहात, याची आम्हाला खात्री आहे . अंधश्रधा निर्मुलन चळवळ आपल्या सहकार्याने वाढणार आहे .आपण अंधश्रधाच्या विरोधात असाल तर आमच्याबरोबर एक पाऊल टाका. 

अंधश्रध्दा निर्मूलन कशासाठी


      
 अंधश्रध्दा निर्मूलन कशासाठी 








१ )  शोषणरहीत समाजाच्या 



       निर्मितीसाठी.


२ ) निकोप धर्मचिकित्सेसाठी. 


३ ) वैज्ञानिक दृष्टी जनमानसात 


                                  रुजविण्यासाठी.


४ ) स्त्री - पुरुष समानतेसाठी.


५ ) मानसिक आणि बौधिक 


     गुलामगिरी नष्ट करण्यासाठी.


६ ) विवेकाधिष्ठित नीती वाढविण्यासाठी.


७ ) राष्ट्रीय संपत्तीचा योग्य विनियोग होण्यासाठी.


८) समर्थ, संपन्न, चारित्र्यवान, निर्भर युवक घडविण्यासाठी .

कार्यपद्धती


वरील उदिष्टे साध्य करण्यासाठी 


आम्ही पुढील उपक्रमांची आखणी करतो  

१) सप्रयोग वेख्याने व शिबिरे 

२) कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग 

३) घोषणा रंगवणे व फलकलेखन करणे 

४) भित्तीचित्रांचे प्रदर्शन करणे 

५) भूत - भानामती ग्रस्त रुग्णासाठी  वैद्यकीय शिबिरे .

६) भानामात्तीच्या केसेस प्रत्यक्ष जाऊन सोडवणे

 ७) भोंदू बाबांचा व त्यांच्या चमत्कारांचा भंडाफोड करणे .

८) अंधश्र्धां ची पहाणी करून आकडेवारी गोळाकरणे 

९) विज्ञान जागर , विज्ञानयात्रा  अशा व्यापक 


  कर्यक्र्मांचे आयोजन .

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

आव्हाने जिंका अणि १५ लाख रूपये मिळावा

१) पाकिटात बंद असलेल्या नोटेचे नंबर अंतर्ज्ञानाने वा अन्य शकतीने ओळखून दाखवा. 
२) शेजारच्या खोलीमधे सूकक्ष्म देहाने प्रवेश करुन त्या खोलीत ठेवलेला कागद वाचून त्यातील मजकूर सांगा. 
३) आमही दीलेली नोट जाळून तशीच नोट / तिकीट पून्हा निर्माण करून दाखवा. 
४) जळ्त्या नीखा-यावर फक्त्त अर्धा मिनीट निश्च्ल उभे राहून दाखवा त पाय न पोळ्ल्यास बक्षीस मिळेल. 
५) हवेतून कोणतीही वस्तू निर्मान करुन दाखवने. 
६) त्राटक शक्त्तीने . ( फ्क्त्त नजरेने ) एखादी लोखंडी सळई वाकवून दाखवा. 
७) टेलीपथी द्वारा , अंतर्ज्ञान शक्त्ती द्वारा दूस-याच्या मनातील विचार ओळखून दाखवा. 
८) तूट्लेला हात, पाय प्रार्थनेद्वारा वा कोण्त्याही श्क्त्तीद्वारा एक इंचानेही वाडवून दाखवा. 
९) योगिक श्क्त्ती द्वारा , हवेत तरंगून दाखवा. 
१०) ह्र्दयाचे ठोके फ्क्त्त पाच मिनीटे थांबवून दाखवा. 
११) पाण्यावर चालून दाखवा. 
१२) एका जागेवर देह ठेवून दूस-याच्या देहात प्रवेश करून अथवा देहासहीत आपोआप दुस-या ठिकाणी प्रगट व्हा. 
१३) योग्य श्क्त्तीद्वारा तीस मीनीटे श्वासो्च्वास थांब्वून दाखवा. 
१४) पुनर्जन्म , भूत लागने वा देवी अंगात येणे या या प्रकारा मूळे माहीती नसलेली भाषा बोलून दाखवा. 
१५)फोटो घेण्यासाठी भूत वा आत्मा सादर करा अथवा भूत लवून दाखवा. 
१६) फोटो घेत्ल्यावर फोटोतून नाहीसे होवून दाखवा. 
१७) लपविलेल्या वस्तू अचूक ओळ्खून दाखवा. 
१८) बंद खोलीतून दैवीश्क्त्तीने बाहेर येवून दाखवा. 
१९) पाण्या्चे रुपांतर दारु, रॉकेल वा अन्य पदार्थात करुन दाखवा. 
२०) दारुचे रुपांतर रक्त्तात करून दाखवा. 
२१) भानामती अस्ते हे सिध्द करुन दाखवा व भानामतीची घटीते घड्वून दाखवा. 
२२) विशारी साप चावल्यावर मंत्राने उतरवून दाखवा. 
२३)ज्योतीषांनी १० कुंडल्यांचा आधारे ( दोनदा) स्त्री वा पुरूष आणी म्रुत किंवा जिवंत. हे नव्व्द टक्के अचुक ओळखून दाखवा. अथवा १० कुंड्ल्यांच्या आधारे विवाह, नोकरी, शिक्षण. म्रुत्यु, अपघात अस्ली तपास्ता येणारी भाकीते ९० ट्क्के अचूक सांगा
.