अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

मंगळवार, १४ जुलै, २०१५

का येतो अधिक मास (महीना)?



धार्मिक कर्मकांड करायला
की
अचूक कालगणनेसाठी...?
चला समजून घेऊया....
   अधिक महीना आला की, नदीत पाप धुऊन टाकायला आंघोळ करणे (दुसरीकडे आपण पाप केलय हे  स्वतःच सिद्ध करणे ), जावयांना भेटवस्तू देणे, जेवण देणे, मांसाहार न करणे , पुण्य मिळवण्यासाठी पुरोहितांच्या हातून धार्मिक कर्मकांड करवून घेण्याची, दान - दक्षिणा देणे  इत्यादींची परंपरा या महिण्यात पाळली जाते.
   पण खरच हे वरील अवैज्ञानिक वर्तन करण्यासाठीच 'अधिक महीना ' येतो का..?
  आपण आपल्या घराच्या भिंतीवर टांगलेले 365 दिवसांचे सौरवर्षाचे (सूर्यावर आधारीत ) कॅलेंडर वापरत जरी असलो तरी सण - उत्सव पंचांगानुसार आपण साजरे करत असतो. चंद्राला पृथ्वी भोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी  लागणारा काळ म्हणजे एक महिना.  या गृहितकावर आधारित आहे पंचांग. ज्याला चांद्रमास म्हणतात.
पण भारतीय पंचांग ' चांद्र - सौर्य ' आहे. याचा अर्थ वर्ष सौर आहेत, पण महिने चांद्र.
चंद्र 29. 5 दिवसांनी पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. म्हणजे चांद्रमास (महीना) 29. 5 येवढ्या दिवसांचा झाला. आता पुढील गणित केल्यास,
29.5 × 12 = 354
हे उत्तर येइल.  प्रत्यक्षात 365 दिवसांचे ऐक सौरवर्ष असताना चांद्रवर्षावर आधारित पंचांगात मात्र प्रत्येक वर्षी 11 दिवस कमी भरतात.
    याचा अर्थ चंद्रवर्ष सौरवर्षापेक्षा 11 दिवसांनी लहान आहे. हे असेच सूरू राहीले असते तर, प्रत्येक सण अकरा - अकरा दिवसांनी मागे - मागे येत, थंडीत गुढीपाडवा, पावसाळ्यात दिवाळी, ऊन्हाळ्यात दसरा साजरा करावा लागला असता. आजचा विचार केला तर हिवाळी आणि उन्हाळी परिक्षेचे वेळापत्रक कोलमडले असते. हा व इतर अनर्थ होऊ नये म्हणून प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी एक युक्ती शोधून काढली, ती म्हणजे अधिक महीना..!  तिसर्या वर्षी चांद्रवर्षात एका महीन्याची भर घातली जाते. कालगणना चूकू नये व पंचांगाची ऋतूंबरोबर सांगड राहावी म्हणून. अशा वर्षी चांद्रवर्षाचे 13 महीने असतात.
    तसे नाही केले तर काय होते ?  याचे चांगले उदाहरण म्हणजे मुस्लिम पंचांग हे होय. ते ही  चंद्रमासावर (चंद्रावर ) आधारीत पण त्यात अधिक महीना घेण्याची तरतूद नसल्याने , प्रत्येक वर्षी मोहरम, ईद हे सण मागील वर्षी पेक्षा पूढील वर्षी 11 दिवस आधी येतात. हा अनूभव आपण प्रत्येक वर्षी  घेतो.
अचूक कालगणना, ऋतूंबरोबर सण व पंचांगाची सांगड जुळवण्यासाठी केलेली तरतूद आज अंद्धश्रद्धेचे मायाजाळ झाले आहे. अधिक महिना का येतो ? याचे पंचांगकर्त्यांनी व त्या आधारे 'शूभ मूहूर्त ' सांगणार्यांनी  खरे - खरे ऊत्तर समाजाला सांगायला हवे होते. तसे न करता पाप - पुण्याची भीती दाखवत. दान - दक्षिणा लाटत
पुरोहीतांकडून धार्मिक कर्मकांडांच्या आधारे जनसामान्यांचे आर्थिक, मानसिक शोषण करणे सूरूच ठेवण्यात आले आणि अधिक महीना शोषण करण्याचे  माध्यम झाले. (याला काही पंचांग अभ्यासक अपवाद आहेत, परंतू  तेच जे  खगोलशास्त्राचे अभ्यासक आहेत.)     
   पंचांग हे खगोलशास्त्राच्या अभ्यासाचे साधन असताना,  आज ते शोषणाचे माध्यम ठरत आहे. हे कटू सत्य आहे..
   हे थांबवण्यासाठी ही माहीती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करूया. समाज शोषणमुक्त करूया ही, कळकळीची विनंती..!
दिनांक 13/07/15
✏- पंकज वंजारे,
जिल्हा संघटक -
अ.भा.अंनिस., जि.वर्धा.,
अध्यक्ष - आकाश निरिक्षण मंडळ,
जि.वर्धा. 9890578583,