" वैदन्यनिक दृष्टीकोण "
किंवा " बुद्धि प्रमान्य वाद "
माणसांच्या पूर्वजांनी जेंव्हा लाखो वर्षा पूर्वी, उंच झाडाच्या शेंडयावरुण खाली उतरून फळ अणि त्यांच्या बिया फोडण्यासाठी दगडाचा उपयोग सुरु केला ,त्याच वेळेस आपल्या दूर दूरच्या नतेवाइक चिंपांजी ,गोरिला,यांच्याशी फार्कत होण्यास सुरवात झाली. त्यांना अजपर्यन्त जमले नाही म्हणून आज ते त्याच अवस्तेत हजारो वर्ष त्याच झाडांच्या शेंडयावर रमलेत.
माणसाचा इतिहास साधरन्त 10 लाख वर्षा चा आहे. अस साधरणत मानल जात. गेल्या 9 लाख 99 हजार वर्षात जेव्हढी प्रगती मानंसाने केली नसेल तेव्हढी प्रगती गेल्या 100 ते 150 वर्षात झाली आहे .याच कारण गेल्या 9 लाख 99 हजार वर्षाच्या अथक प्रयत्नाने माणसाला 100 ट्क्के सत्य शोधता येऊ लागले आहे . सत्य शोधनारे " विदन्यंन " म्हणजे ज्याला " मोज पट्टी "म्हणा किंवा सत्य शोधनाचे हत्यार म्हणा ,ज्याल वैदन्यनिक भाषेत " सांयटफिक्ट् मेथड " म्हटल जात, "वैदन्यनिक प्रक्रिया " म्हटल जात ती सापडली. ति काही एका दिवसात सापडलेली नाही, हजारो वर्ष प्रयोग करत करत, तिचा वापर करात करत ,सत्य शोधन्यची धडपड करात करत, मधल्या काळात ती सापडली 18 व्या शतकात अमलात आली ,अणि सर्व संशोधन क्षेत्रात तिचा वपर सुरुझाला . हे एक मात्र हत्यार असे आहे संशोधनसाठी सगळ्याच क्षेत्रात वपरल जात ,जीवनात प्रतेक गोष्टींकडे अणि विद्न्यनाच्या क्षेत्रात प्रतेक ठिकाणी ही प्रक्रिया अपन वपरतो अणि सत्य शोधतो म्हणून माणसाने एवढी प्रगती केलिली आहे. हे माणसाने लक्षत घेतल पाहिजे .
काय आहे ही "वैदन्यनिक प्रक्रिया " ?
आपल्या देशतील शिक्षन पद्धतीचे दुर्दैव आहे .अपन शाळा कोलेजत शिकलात ,शिकत असाल ते सर्व च्या सर्व ह्या प्रक्रियेने मिळालेले आहे परन्तु आपल्याला मात्र ही " सांयटफिक्ट् मेथड " शिकवली जात नाही, हेच आपले दुर्दैव आहे अस म्हणाव लागेल .
निसर्गा मधे जेकाही घडत याचा मानुस आपल्या पाच इंद्रयांमार्फत निरीक्षण करतो अणि अशाच पद्धतीच्या घटना वारंवार का घड़तात याच्या मागे काहीतरी कारण असले पाहिजे याचा अनुमान करतो ,जेंव्हा वारंवार हेच अनुमान निघत ,दूसरे काही असुच शकत नाही ,अस जेंव्हा वाटत तेंव्हा त्याला अपन " निष्कर्ष "म्हणतो .
1) म्हणजे निसर्गत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांनच्या अधारे एखाद्या गोष्टीचे वारंवार 'निरीक्षण' करुण अपण 'निष्कर्षा' पर्यन्त पोहचतो. ही झाली विद्न्यनचि पहिली प्रक्रिया याला अपन "इंडेक्टिव्ह प्रोएस" असे म्हणतो .
2) आता जो ' निष्कर्ष ' आपल्याला प्राप्त झालेला आहे .तो खरा अहे की खोटा आहे हे तपसन्या करता आपन वेगवेगळ्या घटना तपासून पहातो ह्याला उलटी प्रक्रिया म्हणजेच याला " डिडेक्टिव्ह प्रोसेस" असे म्हणतात . चला अपन उद्धरण घेऊन पहुया .
उदा:- "हिरवा आंबा आंबट असतो" .एक बागेत 100 लोक गेले, 100 आंबे तोडले ते खाऊंन पाहिले , तर ते लागले आंबट पुन्हा 100 जन वेगवेगळ्या बागेत जाऊंन हिरवे आंबे खाऊंन पाहिले तेहि आंबट लागले. यातून निष्कर्ष निघाला " हिरवा आंबा आंबट असतो "
अत्ता हाच निष्कर्ष आपल्याला उलट तपासून पहायचा म्हणजे जेजे "आंबट आंबे आहेत ते ते हिरवे असले पाहिजे ".
पुन्हा 100 लोकांना 100 बागेत पाठवले सगळ्या प्रकारचे आंबे खाऊंन पहा जेजे आंबट असती ल त्यांचे ढिग तयार करा ,सगळे आंबे चाखुन जमा झाले अणि मग तपसन्याची प्रक्रिया सुरु झाली
त्यात काही हिरवे निघाले ,काही पिवळे निघाले ,कही शेंद्रि निघले ,असे वेगवेगळ्या प्रकारचे आंबट आंब्यांचे ढिग जमा झाले .
यावरून असे दिसून आले पहिला जो निष्कर्ष होता तो 100 टक्के बरोबर नहीं, म्हणजे सगळेच "हिरवे आंबे आंबट असतात" एका बाजूने हे बरोबर जरी असले तरी सगळेच "आंबट आंबे हे हिरवे नसतात " हा यातून अपन अंतिम निष्कर्ष काढला .
याला म्हणतात वैदन्यनिक प्रोसेस किंवा "हैपोथीसेस" याच रूपांतर थिअरी मधे होते मग वारंवार हीच पद्धत वपरल्याने दूसरा निष्कर्ष निघत नाही अस जेंव्हा घडत तेंव्हा त्याला म्हणतात "प्रुढ़ थिअरी " किंवा " सिद्ध झालेला सिद्धांन्त " कारण याच्या विरोधात आपल्याला एकही पुरवा मिळालेला नसतो , हासिद्धान्त अपुरा आहे अस सांगणार एकही कृती आपल्याला सपडलेली नसते अणि म्हणून अपन तीला
" प्रुढ़ थिअरी " किंवा सर्व सामान्य माणसाच्या दृष्टीने " सिद्ध झालेला सिद्धांन्त " यालाच अपन व " विज्ञान " अस मानतो अणि हे विज्ञान कधीही बदलत नाही.
हेजे " विज्ञान" आहे ,ते वैदन्यनिक प्रक्रियेतून मिळालेला सत्य आहे ,हे आपल्या जीवनात स्वीकारण, आपल्या अभ्यसच्या बाहेर च्या तुमच्या माझ्या जीवनात जेकाही प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या सोडवन्या साठी अजुबाजुल घडणाऱ्या गोष्टींचा शोध घेन्या साठी या वेदन्यनिक प्रक्रियेचा वपर कारण म्हणजेच मित्रांनो "वैदन्यनिक दृष्टी कोण" वापरण किंवा "बुद्धि प्रमान्य वाद " वापरण म्हणा किंवा "विवेक वाद" अस म्हणतात .
हा " वैदन्यानिक दृष्टीकोण " किवा " "बुद्धि प्रमान्य वाद " आपल्या जीवनात अमलात आना बुद्धिवादी व्हा आपल्या जीवनातील सर्व समस्या सोडवण्या साठी कोणताही बुवा ,बाबा ,मंत्रक, जोतिषी, भगत ,अम्मा ,माता, माताजी ,पोथ्या परायणे, यज्ञ ,होम,हवन,नारायण नाग बळी , दान धर्म, उपयोगी पडणार नाही यात आपली फसगतच होईल.आपल्या जीवनातील कोणत्याही समस्या ह्या " वैदन्यानिक दृष्टीकोण " लाऊंनच सोडवाव्या लागतील .
वैदन्यानिक दृष्टीकोणाचे हत्यार आपल्या ला दिले आहे. अपन ते आपल्या जीवनातील सर्व स्मस्यानां लाऊंन सोडवाल आणि आपल जीवन आनंदी बनवाल अशी आशा बळगतो.
मांडणी -प्रा.श्याम मानव
शब्दांकन -सुर्या
30-08-2015
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा