अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

कंब्बलवाले बाबा यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत तक्रार दाखल..

*अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती* 
मुंबई , मुंबई-उपनगर  जिल्हा यांच्या वतीने आज  दि.१६/०९/२०२३ रोजी दुपारी विक्रोळी पार्कसाईट सुर्यानगर विक्रोळी पच्क्षिम येथील साहाय्यक पोलिस निरिक्षिक यांच्याकडे कंब्बलवाले बाबा यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा तसेच ड्रग्ज ॲन्ड रेमिडीजॲक्ट अंतर्गत तक्रार  केंद्रीय उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली  दाखल करण्यात आली आहे तरी यासमयी चंद्रकात सर्वगोड- मुंबई संघटक ,सुर्यकांत जाधव -भांडाफोड प्रमुख , सचिन हिंदळेकर -मुंबई-उपनगर संघटक , सुनिल मोरे- उपनगर सहसचिव , जे.के. साबळे उपनगर- खजिनदार , महेंद्र पवार तसेच सोनावणे हे कार्यकर्ते उपस्तीत होते..
तसेच महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पाथोडे सर आपले राष्ट्रीय अध्यक्ष  मधुकर कांबळे साहेबांनी केलेल्या मार्गदर्शन केले.....🌞

अ भा अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाडॉ . गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार



अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती
या संघटनेला शनिवारी ( ९ सप्टेंबर ) डॉ . गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराने नागपुरात गौरविण्यात आलं .
डॉक्टर सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र व सी . मो . झाडे फाउंडेशन या संस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कारानिमित अंनिस व तिचे संस्थापक संघटक प्रा . श्याम मानव यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा .

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेचा इतिहास मोठा रंजक आहे . १ ९ ८० च्या दशकात नागपुरात रॅशनलिस्ट असोसिएशन ही संघटना चर्चेत होती . तेव्हाचे नागपूर विद्यापीठाचे मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा . चंद्रशेखर पांडे , उमेश चौबे , पत्रकार म.य. दळवी ही मंडळी या असोसिएशनमध्ये कार्यरत होती . अंधश्रद्धा , बुवाबाजी , भोंदूगिरी अशा विषयांत चर्चा , व्याख्यानं , जनजागृती हे काम या असोसिएशनच्या माध्यमातून चालत असे . याच मंडळींनी पुढाकार घेऊन नंतर मानवीय नास्तिक मंचची स्थापना केली . सुधाकर जोशी , नागेश चौधरी हे सुद्धा त्यांच्यासोबत सक्रिय होते . १ ९८१-८२ मध्ये विख्यात रॅशनॅलिस्ट बी . प्रेमानंद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते . नागपुरात त्यांच्या इंग्रजी भाषणांचा मराठीत अनुवाद करण्याचं काम श्याम मानवांनी केलं . मानवांनी तेव्हा इंग्रजीची प्राध्यापकी सोडून पत्रकारिता सुरू केली होती . ‘ तरुण भारत ' या दैनिकात ते युवकांचा स्तंभ चालवित असत . वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांमध्येही ते सक्रिय होते . त्या काळात अब्राहम कोवूरांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता . विदर्भात मोठय़ा प्रमाणात असलेल्या अंधश्रद्धा , भोंदू महाराजांचं वाढलेलं प्रस्थ या विषयात काहीतरी केलं पाहिजे , हा मानव आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये नेहमी चर्चेचा विषय असे . प्रेमानंदांच्या दौऱ्याने त्या विचाराला बळकटी आली . सर्वसामान्य लोकांना समजेल आणि रुचेल अशा भाषेत त्यांच्यापर्यंत हा विषय नेला पाहिजे , यावर नास्तिक मंचच्या कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता होऊन श्याम मानवांच्या नेतृत्वात डिसेंबर १ ९ ८२ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जन्म झाला . ' आमचा देवा धर्माला विरोध नाही . देवाधर्माच्या नावाखाली शोषण करणाऱ्या , लुबाडणूक करणाऱ्यांविरुद्ध आमचा लढा आहे ' , ही भूमिका घेऊन या कामाला सुरुवात झाली .
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १ ९९ ० चं दशक अक्षरश : गाजवून सोडलं होतं . समितीच्या कामाचा तेव्हा महाराष्ट्रभर गाजावाजा होता . श्याम मानव व त्यांची टीम जवळपास चार दशक विदर्भात हीरो होती . तो काळ काही फार जुना नाही . अगदी आता काही वर्षापूर्वीची वर्तमानपत्रं पाहिली तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पराक्रमाने रकानेच्या रकाने भरलेले आढळतील . स्थापनेनंतर लवकरच अंनिसने विदर्भात खळबळ उडवून दिली होती . चमत्कार व दैवी शक्ती अंगात असल्याचा दावा करणाऱ्या अनेक बुवा - महाराजांना समितीने आव्हानं देणं सुरू केले होते . बेबी राठोड , गुलाबबाबा , शेळकेबाबा , रज्जाक बाबा अशा अनेकांचा समितीने भंडाफोड केला आणि पायलटबाबा , कृपालू महाराज , बोलका पत्थरवाले पटवर्धन , अनेकांवर फजित सुंदरदास महाराज , नैनोदचा बाबा , शुकदास महाराज , आनंदीमाता , परिअम्मा , अशा अनेकांचे पितळ समितीने जनतेसमोर उघड केले . शकुंतलादेवीसारख्या होऊन नागपूर सोडण्याची पाळी आली होती . अलीकडच्या काही वर्षात कंबलवाले बाबा , ज्योतिषी नंदकिशोर जकातदार , पवन महाराज , तवेवाले बाबा , रवींद्र बाबा , डॉ . स्नेह देसाई , बागेश्वर बाबा आदींना पळवून लावण्याची कामगिरीही अंनिसच्या नावावर आहे . काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर श्याम मानव आणि बागेश्वर बाबा यांचे वादविवाद चांगलेच गाजले होते . गेल्या ४० वर्षात विदर्भातील प्रत्येक मोठय़ा शहरात समितीच्या शाखा स्थापन झाल्या आहेत . समितीच्या कार्याचा विस्तार केवळ विदर्भातच नाही तर मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र , मुंबई , कोकण , खानदेशमध्येही झाला आहे . गुजरात , मध्यप्रदेश , गोवा , उत्तर प्रदेशातही श्याम मानव व त्यांचे कार्यकर्ते जाऊन आले . अनेक मोठे ज्योतिषी व महाराजांना आव्हान देण्याचं काम जोरात होतं . तेव्हा काहींनी तुमची संघटना मान्यताप्राप्त नाही , असा मुद्दा काढल्याने १ ९ ८६ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाने संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली . श्याम मानव हे अखिल भारतीय संस्थापक संघटक होते . पहिले अध्यक्ष प्रा . चंद्रशेखर पांडे , तर कार्याध्यक्षाची जबाबदारी सुप्रसिद्ध विचारवंत प्रा . भा.ल. भोळे यांच्याकडे होती . उमेशबाबू चौबे , रूपाताई कुळकर्णी , हरीश देशमुख , नागेश चौधरी , सुधाकर चौधरी , सुरेश अग्रवाल ही मंडळी पदाधिकारी होती . अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उल्लेख आला की अनेकांच्या डोळ्यांसमोर बुवा -महाराजांचा भंडाफोड एवढीच एक गोष्ट येते . मात्र शेकडो भंडाफोड केले तरी नवनवीन बुवा – महाराज तयार होतच राहतात हे लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य माणसाला विवेकी बनवणे . त्याला तर्क व बुद्धीने विचार करण्याची सवय लावण्याची आवश्यकता समितीच्या लक्षात आली . अंधश्रद्धांची निर्मिती का होते ?, माणसं ढोंगी , बुवा -महाराजांना शोषणाला बळी का पडतात ? महिलांचे देव -धर्माच्या नावाखाली लैंगिक शोषण का होते , याचा सखोल अभ्यास करून प्रा . श्याम मानव यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळांची आखणी केली . मानवी मेंदू , मन कसे काम करते हे लक्षात घेऊन स्वसंमोहन व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा , कौटुंबिक स्वास्थ कार्यशाळा सुरू करण्यात आल्या . त्यातून विवेकी ब बुद्धीप्रामाण्यवादी कार्यकर्ते तयार होण्यास सुरुवात झाली . वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्री - पुरुषांनीही या कार्यशाळांचा लाभ घेऊन स्वत : च्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणलेत . अलीकडच्या काही वर्षात जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आग्रही आहे . जादूटोणाविरोधी - कायद्याचा मसुदा तयार करण्यात श्याम मानव यांचाच पुढाकार असल्याने त्यांनी अतिशय परिणामकारक पद्धतीने या कायद्याच्या विषयात पोलिस अधिकारी , कर्मचारी व व वेगवेगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले आहे . अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही या विषयात सखोल अभ्यास करून ग्रामीण भागात कायद्याविषयी प्रबोधन सुरु केले आहे . अंनिसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिवाची बाजी लावून समाजप्रबोधनासाठी स्वत : ला समर्पित केल आहे .
असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी दिली आहेत . अनेक कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहे .

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

आव्हान स्वीकारें बिना भाग गया धीरेन्द्र शास्त्री

*भगोड़ा निकला पाखंडी धीरेन्द्र शास्त्री* - श्याम मानव

*30 लाख का आव्हान स्वीकारें बिना भाग गया* धीरेन्द्र शास्त्री ।

*गडकरी, फडणवीस* और कही *आमदारो* ने *आशीर्वाद* लिया ।🌞

👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/gon7_BMXY8U

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

धीरेंद्र कृष्णजी महाराज चमत्कार सिद्ध करा आणि 30 लाख घेऊन जा


*धीरेंद्र कृष्णजी महाराज👳🏼‍♀️*
*👉🏻चमत्कार सिद्ध करा आणि 30 लाख घेऊन जा*💥
 *👉🏻अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समतीचे आव्हान*

*श्री धीरेंद्र कृष्णजी महाराजांना चमत्कार , दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे ३० लाखांचे आव्हान -* प्रा . श्याम मानव

 *सा . पो . आयुक्तांना कार्यवाही करण्याबाबत दिले निवेदन*
 
नागपूर -' दिव्यशक्ती असते , चमत्कार होतात , आपण कुणाचेही नाव , आजार , मनातील ओळखू शकतो ' असा दावा बागेश्वर धामचे पीठाधीश्वर श्री धीरेंद्र कृष्णजी महाराज करतात . त्यांना ' चमत्कार , दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे ' ३० लाखांचे खुले आव्हान देण्यात येत आहे .

*त्यांच्या विरुद्ध जादूटोणा विरोधी कायदा व ड्रग्ज ॲन्ड मॅजिक रेमेडीज कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी करणारे निवेदन रोशन पंडित एसीपी क्राईम , प्रधान दक्षता अधिकारी , जादूटोणा विरोधी कायदा , नागपूर यांना रविवार दि . ८ रोजी देण्यात आली आहे . शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती , प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी ( पीआयएमसी ) समितीचे सहअध्यक्ष तथा अ . भा . अंनिसचे संस्थापक प्रा . श्याम मानव यांच्यासमवेत हरिश देशमुख , सुरेश झुरमुरे , प्रशांत सपाटे , भगवान खराते , सुनिल वंजारी , राजेश वानखेडे , राजू नाईक यांनी हे निवेदन दिले .

 याविषयीची माहिती प्रा . श्याम मानव यांनी आज सोमवार दि . ९ रोजी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत दिली . सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , महाराष्ट्र राज्य अंतर्गत पीआयएमसी तर्फे निवेदन देण्यात आले . प्रा . श्याम मानव यांनी पुढे सांगितले , ' प्रधान दक्षता अधिकारी यांना स्वतःहून कार्यवाही करण्याचा अधिकार आहे . या कायद्याअंतर्गत दोषसिध्दी नंतर ६ महिने ते ७ वर्षे कारावास आणि ५ हजार ते ५० हजार रुपये दंड एवढी शिक्षेचा अंतर्भाव आहे . 
 • ' श्री धीरेंद्र कृष्णजी महाराज , बागेश्वर धाम , जि . छत्तरपूर , मध्यप्रदेश यांचे नागपूर येथे सध्या श्री रामकथा प्रवचन निमित्त आगमन झाले आहे . श्री रामकथा प्रवचन करण्याचा त्यांना अधिकार आहे . त्यांचे आम्ही स्वागतही करतो आणि आदरही करतो . पण याच निमित्ताने ते ' दिव्य दरबार ' आणि ' प्रेत दरबार ' ( त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ) आयोजित करताहेत , केलाही आहे . दिव्य दरबाराचे त्यांचे अनेक व्हिडिओज यूट्यूब वर उपलब्ध आहेत . त्यामध्ये केलेल्या दिव्य शक्तीच्या दाव्याने , प्रयोगाने प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणावर देशातील व नागपूर परिसरातील लोक महाराजांच्या भजनी लागताहेत . अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ४० वर्षे महाराष्ट्र आणि देशात विविध राज्यात काम करते आहे . देवा - धर्माला विरोध नाही पण देव - धर्माच्या नावावर सामान्य जनतेची लुबाडणूक , फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध पाऊले उचलून जनतेला फसवणूक व शोषणापासून वाचवणे आणि त्यांचे प्रबोधन करणे ही समितीची भूमिका आहे , कार्य आहे . श्री धीरेंद्र कृष्णजी महाराजांच्या या दिव्यशक्तीच्या दाव्यांना आणि प्रयोगांना अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ३० लाख रुपयांचे खुले आव्हान जाहीर आहे . प्रा . श्याम मानव यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली . त्यांनी श्री धिरेंद्र कृष्णजी महाराजांच्या दरबारातील व्हिडिओतील त्यांच्या द्वारे चमत्कार , दिव्यशक्तींच्या केलेल्या दाव्यांचे पुरावे यावेळी पत्रकारांसमोर सादर केले .
 
 महाराजांचे व्हिडिओज मधील चमत्कारीक दावे
भक्तांच्या समस्या दिव्य शक्तीद्वारे महाराजांना आपोआप कळतात , असा दावा महाराज करतांना दिसतात . अशा प्रकारचे दावे महाराजांनी अनेक व्हिडिओजमध्ये केले आहे .
 
*महाराज काय दावा करत आहे ?*

 ( अ ) *महाराज कुणाचेही वय आणि नाव ओळखून अचूक सांगू शकतात .* 
( ब ) *महाराज कुणाचाही मोबाईल नंबर त्या व्यक्तीचे नाव माहीत नसताना सांगू शकतात .* 
( क ) *महाराज कुणाच्याही घरातील वस्तू सांगू शकतात*

असे दावे त्यांच्या वरील व्हिडिओत केले आहेत . वय , नाव , मोबाईल नंबर आपोआप ओळखणे हे मानवी शक्तीला शक्य नाही . दुसऱ्याच्या घरातील वस्तू आपोआप ओळखणे ( Clairyonce ) हेही शक्य नाही . असे सांगत श्याम मानव यांनी श्री धीरेंद्र कृष्णजी महाराजांना त्यांची ही दैवी शक्ती वा दैवी कृपा Fraud and Proof Condition मध्ये सिद्ध करण्याचे जाहीर आव्हान महाराजांना दिले आहे .🌞🖋️

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

अभा अंधश्रध्दा निर्मूलन समितीला ४० वर्ष पूर्ण

चिन्ह अनावरण समारंभ,प्रशिक्षण शिबीर संपन्न

मुंबई, मुंबई उपनगर ,ठाणे व रायगड जिल्हाच्या वतीने  आयोजित 'एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर' व समितीच्या ४० वर्ष पुर्ति निमित्त 'चिन्ह अनावरण सोहळा' हा कार्यक्रम रविवारी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन ,सानपाडा, नवी मुंबई या ठिकाणी संपन्न झाला .
 अ.भा.आनिसचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे यांच्या हस्ते ४० व्या वर्ष पुर्ति चिन्हाचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर ,महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पाथोडे  यांनी ४०व्या वर्ष पुर्ति च्या निमित्ताने समितीने केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांसमोर मांडली.  या चिन्हाचे निर्माते कालाकार व समितीचे भांडाफोड प्रमुख सुर्यकांत जाधव हे या कार्यक्रमास उपस्थित होते . शिबीराचे उद्घाटन ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ.प्रकाश ढोकणे यांच्या हस्ते झाले.
  प्रशिक्षण शिबीरात वैज्ञानिक दृष्टीकोन व महाराष्ट्र सरकारचा जादूटोणा विरोधी कायदा यांच्या प्रचार प्रसार यासाठी विविध  विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
 मुंबई संघटक चंद्रकांत सर्वगोड ,मुंबई सचिव अजित पाध्ये ,मुंबई-उपनगर संघटक सचिन हिंदळेकर ,उपनगर सचिव धनाजी जाधव ,ठाणे जिल्हा महिला संघटिका नीता डुबे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले . शिबीर नोंदनीसाठी प्रिती कुटे व हॉल व्यवस्था यासाठी विद्या सर्वगोड यांचे सहकार्य लाभले. आणि समारोप रायगड जिल्हा संघटक नरेंद्र जाधव यांनी केला.
विविध संस्थाचे कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात शिबीर संपन्न झाले.

रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२

खडे वाला बाबाचा भांडाफोड



खडेवाला वाला बाबा 

'साधारण ९४ ते ९५ साल दरम्यानचं साल असावं...मुंबईतील अनेक रोडवर बाबा पाण्याच्या प्लास्टिकचे छोट्या बादल्या ,राशींचे खडे,अंगठ्या मांडून बाबा चमत्कार दाखवून रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फसवण्याचा धंदा मांडून बसू लागले होते... 

आज आठ दिवस झले रोज मी अजमेर वाल्या बाबाच्या मागावर होतो. रोज सकाळी हॉपीसला जाताना तासभरतरी  त्याच्या चमत्कार करण्याच्या पद्धतीवर बारीक लक्ष ठेऊन आसायचो. त्याच्या बरोबर कॊण कोण आहेत ,ह्यासर्वांचं बारीक सारीक निरीक्षण करत होतो.पण त्याची हातचलाखी माझ्या लक्षत येत न्हवती.अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हातचलाखी करत होता ...   धिपड साधारण सवासफुट उचं, छतीवर रुळणारी दाढी अंगात पंढरा कुर्ता , वर काळ हाफ जॅकेट ,डोक्याला हिरवा कपडा गुंढाळलेला कमरेला बारीक चौकडीची लुंगी, गळ्यात वेवेगळ्या मोठाल्या रन्गीबेरंगी मण्यांच्या माळा,भेदकनजर. असा हा अजमेरवला मुस्लिम बाबा लोअरपरेलच्या ब्रिजवर बसून लोकांना चमत्कार दाखवून गंडवण्याचा धंदा मांडून बसला होता . त्याची चमत्का करण्याची पद्धत अनोखी होती ..

समोर बसेल त्या व्यक्तीच्या हाताखाली जमिनीवर एक तांब्याच्या कलशावरील झाकणावर एक जुनाट तांब्याच नाणं ठेवायचा त्यावर त्याच्या जवळील गुळगुळीत राशींचा खडा किंवा अंगठी त्यावर ठेवायचा आणि  त्यावर हात न टेकवता हवेत, समोरच्या बसलेल्या व्यक्तीला तळहात वर करून त्या वर प्रथम चमच्याने दूध टाखयचा  आणि नंतर बाजूच्या प्लस्टिक च्या बादलीतल स्वछ पाणी सोडायचा ,खालील रंगिबिरंगी खडे दोनच्यार वेळेस बद्दलवायचा. एखाद्या वेळीस हातावरील पाणी गुलाबी रंगाचे व्हयचे बस लेल्या व्यक्तीला आचार्य वाटायचे ,त्याच्या चेहयावरील हे भाव हेरून बाबा " ये पथ्थर आपके राशिका है इसे पाहननसे आप की सारीपरशानीया  सारे दुख दर्द दूर होजयेंगे, नोकरी धंदेने कारोबर में बरकत आजायेगी, अपकी सारी परेशानीयां दूर होजायेगी " अस सँगून अनेक लोकांना त्यानीं गंडवल अनेक जाणारे येणारे लोक  त्याच्या चमत्काराला भुलून तीन ,चारशे रुपयांना त्याला देऊन राशींचे खडे अंगठ्या त्या कडून घेत होती. आणि वा काय बाबा आहे असंम्हणत बाबाची स्तुती करून त्यानें केलेल्या चमत्काराचे गोडवे गात निघून जात होते ... 

गेली आठ दिवस मी त्याचं निरीक्षन करीत होतो , पाणी गुलाबी का होत ? याचं रासायनिक करणं माहित होत, त्याचे अनेक प्रयोग अनिसच्या झाहिर कर्यक्रमातून करत होतो, हे माहीत होतं पण ते मिक्स करण्याचीत्याची पध्द्त मात्र त्याची अनोखी होती आणि तेच तर मला शोधायचं होत अनीती सहज लक्षात येत न्हवती त्यामुळे अनेक बाबा रस्तो-रस्ती हे चमत्कार करून खडे विकत होते ....एक दिवस असाच हॉपीस सुटल्यावर घरी निघालो असता बाबा भोवती पडलेल्या गराड्यात उभा राहिलो त्याच चमत्कर करण्याचा प्रयोग सुरु होता. आणि अचानक माझ्या नजरेला त्यचि हातचलाखी सापडली , मी आणखी थोडा थांबलो आणि पक्की खात्री करू घेतली... आणि बाबा ला एक्स्पोझ  करयच प्लॅन नक्की करून पुढील कमाला लागलो...

नुकत्याच दोन, तीन फसलेल्या माणसांना जातांना गाठलं त्यानां तम्ही कसे फसलात हे समजवायचा प्रयत्न केला, त्यातील एकानं मला मुर्खात काढून निघेऊन गेला दोघांना माझ्या बोलण्यात तथ्य जाणवलं त्यांना जवळच्या  पणाच्या टपरीवर नेहून चुना हाताला लावून माझ्या पाकिटातील पर्गोल्याक्सची पावडर त्याच्या हाताला चोळून चमत्कार करून दाखवला. ते त्यांची पक्की खात्री झाली.  आपण फ़सलोय दोघानी चारशे चारशे रुपयांना खडे घेतले होते बाबाला लाखोली वाहू लागले ते तेथील जवळपास रहाणारे असावेत. ते म्हणू लागले  'आमच्या सोबत चला त्या बाब ला आपण चोप देऊ उठून लावू ' वैगरे वैगरे ... पण असा आततायी पण करणे योग्य न्हवतं, प्रसंग काहिही घडला असता रस्त्यात हाणामारी झली असती, सगळ्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी बाबाला बेदम मारलं असतं, आणि मी एकटाच असल्यानं लोकांना आवरण कठीण गेलं असतं आणि असं होऊ नये यासाठी त्यांची कशी बशी समजूत काढून समजावून जवळच असलेल्या बीडीडी चाळीतील मंगेश पवार आणि इतर आपल्या नवीन कार्यकरत्यांना बरोबर घेतल. आणि बाबाला गाठलं त्यातील एक दोघाच्या हाताला पर्गोलैक्स ची पावडर चोळून बाबा च्या समोर बसवलं. बाबानी सराईत पणे वाटीतील दुध पळीने हातावर सोडताच हात लाल झाला. आणि बाबाच्या तोंडावरील भाव पहाण्या जोगे झाले त्याला काय बोलावं ते सुचेना स्वछ पाणी हातावर सोडण्या अगोदरच हातातील सोडताच दुध कसकाय लाल झाला हे पहाणारी जमावातील मानसही अवाक झाली . तेवढ्यात बाबाने सावरायचा प्रयत्न केला ... " अपने कूच दावाई खाई है इसलिये ऐसा हुवा ,नाही तो ऐसा नही होता " मी ' ठीक है इसने दावाइ खाई, है तो दुसरा आदमी बैठे गा हिसके हातपे अपका चमत्कार करके दिखावो ' दुसऱ्या कर्यकर्त्याला बसवलं त्या च्या हातवर दूध सोडताच त्याचाही हातील दूध गुलाबी रंगाचं झालं झाल आणि बाबा समजून गेला काहीतरी गडबड नक्की होणार आहे हे ओळखून आम्हालाच दमात घेऊन .. ' क्या मजाक लगाय है आप लोगोने दवा हात को लगाकर आयेहो '... असं काही बाही ओरडून बोलू लागला दुसरं कोण असत तर त्या धिपाड बाबाचा अवतार बघून नक्कीच पळ काढला असता... एव्हाना रस्ताने जाणारी येणारी अनेक माणसं जमा झाली होती. हि पोर ह्या बाबाशी काय गोंधळ घालतात ते पाहू लागली होती . आणि आंम्हालाही मागे हटन शक्य न्हवत ..  मग बाबाला मीच दमात घेतलं ' बस हो गया तुम्हारा नाटक येसबा उठाओ और हमारे सात पोलीस स्टेशन चलो ' बाबा :' हा हा चलो मैने क्या गुन्हा किया हैक्या चलो ' म्हणतं बाबा उठला आपला गाशा आवळू लागला ... मनात म्हणालो आता मात्र लंचांड आहे. ह्याला पोलीस स्टेशन मध्ये न्ह्यायचे  शिवाय ते दोघे फसलेले कुठे गर्दीत दिसेनात आत्ता काय करावे ते जर पोलीस टेंशन मध्ये आले नाहीतर पुन्हां गडबड होईल .. शेवटी त्याला पुन्हा ठेवणीतला दम दिल्हा ' पोलीस टेंशन मे येसबा करके दिखाना पडेगा, वांह तुम्हारा ये सब समान चेक करेंगे ,सब ,अगर कूच गडबड होगया  तो तू छह महिना अंदर जरूर जायेगा ' हि माझी मात्रा लागू पडली, एव्हढा मोठा बाबा गया वाया करू लागला , पाय धरू लागला ,रडण्याचं नाटक करू लागला एव्हढ्या मोठ्या धडधाकट बाबा गयावया करूलागला आणि एवढा वेळ कुठे दिसेनासे झालेले ते दोघे येऊन बाबाला मारण्याची भाषा करू लागले ,शिवी गाळ करू लागले ,पैसे परत मागू लागले ... बाकीच्या कर्यकर्त्यांनी त्या दोघानां आवरलं बाबाला त्या दोघाचे पैसे परत करण्यास सांगितले . तेवढ्यात आधल्या दिवशी फसलेले दोन तीन जण  हातात अंगठी दाखवून म्हणाले आम्हांलाही यान फसवलं त्यांची समजूत काढून त्यानां गप्प केलं . जमलेल्या लोकांना तो  काय चमत्कार करत होता ते त्याच सामान साहित्य घेऊन सप्रयोग करून दाखवून समजावून सांगितलं . आणि बाबाला तंबी दिली ' धट्टे कट्टे हो कुछ कंमधंदा करो, लोगोंको उल्लू बनानेक धंदा छोड दो, और यहाँ वापस बैठो मत अभी छोड रहा हूँ  वापस ईधर दिखाई दियेतो सीधे पोलीस स्टेशन लेके जाऊंगा'. ' बाबा केविलवाणी म्हणाला नाही साहब हम यहाँ नाही रुकेंगे हम अजमेर चले जायेंगे '.... सर्व गाठोडं आवळून पाठीवर मारून रेल्वेस्टेशन कडे रवाना झाला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतिकडे पाहून मनात विचार करतहोतो. मला त्याची एकीकडे दयाही येत होती ह्या धक्काधकीच्या जीवनात लोक पोट भरण्या साठी कोण कोणत्या क्लुप्त्या करतात असतात... त्याला कोणी मरणार तर नाहीना हे पहात तो जाई पर्यंत आम्ही उभेच होतो. तो रेल्वे स्टेशनच्या गर्दीत दिसेनासा झाला आणि आम्ही निघालो... 

तो काय चमत्कार करत होता - हातावर चुण्याचे पाणी दूध म्हणून सोडायचा , वरून स्वछ पाणी टाखान्याच्या बहाण्याने, प्लस्टिकच्या बदलीच्या काठात जिथे बदलीची कडी लावलेली असते तेथे आतल्या प्लस्टिकच्या ठोकळ्याच्या  बाजूला परगोलीक्स गोळीच्या पाऊडरचा गोळा चिटकून दडवलेला असतो. बदलीवर बाबाचा हात असतो बोलण्यात इतर लोकांचं लक्ष वेधून हळूच अंगठा  पाऊडरच्या गोळ्याला चिटकून अंगठा सोडून चार बोटानें पाणी घेऊन समोरील व्यक्तीच्या हातावरील चुन्याच्या पाण्यावर अंगठ्या वरून सोडलं कि पाणी गुलाबी होते. परगोल्याक्स मधील फिनॉल थेलिन नावाच्या केमिकलच आणि चुन्याचं पाणी एकत्र आले कि पाणी गुलाबी होते .... 

- सूर्यकांत जधाव

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

भारत जोडो पदयात्रा


भारत जोडो पदयात्रा व अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती सभे बाबत महत्त्वपूर्ण सूचना

खा. राहूल गांधी  यांनी सुरु केलेल्या  कन्याकुमारी ते काश्मीर  पदयात्रेला हळूहळू सर्व स्तरातून सर्वव्यापी प्रतिसाद मिळत आहे.देशभरातून दोनशेवर सामाजिक चळवळींनी पदयात्रेस पाठिंबा दिला आहे .महात्मा गांधी व  विनोबा भावे यांचे नंतरची ही सर्व वर्गातून पाठिंबा प्राप्त होणारी पहिली पदयात्रा आहे . 
 17 व 18 नोव्हेंबर रोजी सदर यात्रा अकोला जिल्ह्यातून जात आहे . या पदयात्रेत अ.भा. अंनिसचे संस्थापक राष्ट्रीय संघटक प्रा.श्याम मानव, राष्ट्रीय अध्यक्ष मधुकरजी कांबळे, कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रवी खानविलकर, राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख, राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, महाराष्ट्र महिला संघटिका छाया सावरकर, सचिव प्रशांत सपाटे, महाराष्ट्र युवा संघटक पंकज वंजारे,विकास झाडे आदी कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत  .
              ----------*----*---------
भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ इच्छित असलेल्या कार्यकर्त्यांकरिता सूचना 

1) यात्रेत आपली इच्छा असेल तरच सहभागी व्हावे.

2) यात्रेत स्वखर्चाने सहभागी व्हावे लागेल. जाणे-येणे, निवास, नास्ता ,भोजन आदी खर्च स्वत: करायचे आहेत .

3) अकोल्यात थंडी असल्याने गरम कपडे, स्वेटर, टोपी- मफलर ,शॉल सोबत आणावी. 

आपली गैरसोय होऊ नये म्हणून् तसेच भेटी, गप्पा चर्चा व्हाव्यात म्हणून अकोल्याचे टीम कडून खालील  व्यवस्था करण्यात आली आहे 

*निवास*
प्रती व्यक्ती - प्रती दिवस 
 ₹ 250 .

*नास्ता*
प्रती व्यक्ती - प्रती दिवस 
₹ 50

*चहा*
₹10

निवासाची व्यवस्था कृषक भवन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व हॉटेल नैवैद्यम अकोला येथे असेल. 

चहा ,नास्ता , भोजन हॉटेल नैवैद्यम येथे असेल. 

याला लागूनच शनिवार  दिनांक 19 रोजी अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक आयोजीत करण्यात येत आहे. त्याची सूचना आपल्याला स्वतंत्र कळविण्यात येईल.

भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपली नावे
दिनांक 10 पर्यंत डॉ.स्वप्ना लांडे यांचे  7507581144 
या  नंबरवर कळवावीत.
सोईकरिता भारत जोडोचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येईल. सदर ग्रुप दिनांक 19 रोजी बंद करण्यात येईल. 

नाव देताना आपण कधी येणार? कधी परत जाणार? कळवावे. नंतर भारत जोडो ग्रुप वर निवास, नास्ता, जेवणाचे पैसे पाठविण्याबाबत कळविण्यात येईल.
अ.भा. अंनिसची बैठकीचे दिवशी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही .