अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

अ भा अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाडॉ . गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार



अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती
या संघटनेला शनिवारी ( ९ सप्टेंबर ) डॉ . गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराने नागपुरात गौरविण्यात आलं .
डॉक्टर सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र व सी . मो . झाडे फाउंडेशन या संस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कारानिमित अंनिस व तिचे संस्थापक संघटक प्रा . श्याम मानव यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा .

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेचा इतिहास मोठा रंजक आहे . १ ९ ८० च्या दशकात नागपुरात रॅशनलिस्ट असोसिएशन ही संघटना चर्चेत होती . तेव्हाचे नागपूर विद्यापीठाचे मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा . चंद्रशेखर पांडे , उमेश चौबे , पत्रकार म.य. दळवी ही मंडळी या असोसिएशनमध्ये कार्यरत होती . अंधश्रद्धा , बुवाबाजी , भोंदूगिरी अशा विषयांत चर्चा , व्याख्यानं , जनजागृती हे काम या असोसिएशनच्या माध्यमातून चालत असे . याच मंडळींनी पुढाकार घेऊन नंतर मानवीय नास्तिक मंचची स्थापना केली . सुधाकर जोशी , नागेश चौधरी हे सुद्धा त्यांच्यासोबत सक्रिय होते . १ ९८१-८२ मध्ये विख्यात रॅशनॅलिस्ट बी . प्रेमानंद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते . नागपुरात त्यांच्या इंग्रजी भाषणांचा मराठीत अनुवाद करण्याचं काम श्याम मानवांनी केलं . मानवांनी तेव्हा इंग्रजीची प्राध्यापकी सोडून पत्रकारिता सुरू केली होती . ‘ तरुण भारत ' या दैनिकात ते युवकांचा स्तंभ चालवित असत . वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांमध्येही ते सक्रिय होते . त्या काळात अब्राहम कोवूरांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता . विदर्भात मोठय़ा प्रमाणात असलेल्या अंधश्रद्धा , भोंदू महाराजांचं वाढलेलं प्रस्थ या विषयात काहीतरी केलं पाहिजे , हा मानव आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये नेहमी चर्चेचा विषय असे . प्रेमानंदांच्या दौऱ्याने त्या विचाराला बळकटी आली . सर्वसामान्य लोकांना समजेल आणि रुचेल अशा भाषेत त्यांच्यापर्यंत हा विषय नेला पाहिजे , यावर नास्तिक मंचच्या कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता होऊन श्याम मानवांच्या नेतृत्वात डिसेंबर १ ९ ८२ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जन्म झाला . ' आमचा देवा धर्माला विरोध नाही . देवाधर्माच्या नावाखाली शोषण करणाऱ्या , लुबाडणूक करणाऱ्यांविरुद्ध आमचा लढा आहे ' , ही भूमिका घेऊन या कामाला सुरुवात झाली .
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १ ९९ ० चं दशक अक्षरश : गाजवून सोडलं होतं . समितीच्या कामाचा तेव्हा महाराष्ट्रभर गाजावाजा होता . श्याम मानव व त्यांची टीम जवळपास चार दशक विदर्भात हीरो होती . तो काळ काही फार जुना नाही . अगदी आता काही वर्षापूर्वीची वर्तमानपत्रं पाहिली तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पराक्रमाने रकानेच्या रकाने भरलेले आढळतील . स्थापनेनंतर लवकरच अंनिसने विदर्भात खळबळ उडवून दिली होती . चमत्कार व दैवी शक्ती अंगात असल्याचा दावा करणाऱ्या अनेक बुवा - महाराजांना समितीने आव्हानं देणं सुरू केले होते . बेबी राठोड , गुलाबबाबा , शेळकेबाबा , रज्जाक बाबा अशा अनेकांचा समितीने भंडाफोड केला आणि पायलटबाबा , कृपालू महाराज , बोलका पत्थरवाले पटवर्धन , अनेकांवर फजित सुंदरदास महाराज , नैनोदचा बाबा , शुकदास महाराज , आनंदीमाता , परिअम्मा , अशा अनेकांचे पितळ समितीने जनतेसमोर उघड केले . शकुंतलादेवीसारख्या होऊन नागपूर सोडण्याची पाळी आली होती . अलीकडच्या काही वर्षात कंबलवाले बाबा , ज्योतिषी नंदकिशोर जकातदार , पवन महाराज , तवेवाले बाबा , रवींद्र बाबा , डॉ . स्नेह देसाई , बागेश्वर बाबा आदींना पळवून लावण्याची कामगिरीही अंनिसच्या नावावर आहे . काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर श्याम मानव आणि बागेश्वर बाबा यांचे वादविवाद चांगलेच गाजले होते . गेल्या ४० वर्षात विदर्भातील प्रत्येक मोठय़ा शहरात समितीच्या शाखा स्थापन झाल्या आहेत . समितीच्या कार्याचा विस्तार केवळ विदर्भातच नाही तर मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र , मुंबई , कोकण , खानदेशमध्येही झाला आहे . गुजरात , मध्यप्रदेश , गोवा , उत्तर प्रदेशातही श्याम मानव व त्यांचे कार्यकर्ते जाऊन आले . अनेक मोठे ज्योतिषी व महाराजांना आव्हान देण्याचं काम जोरात होतं . तेव्हा काहींनी तुमची संघटना मान्यताप्राप्त नाही , असा मुद्दा काढल्याने १ ९ ८६ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाने संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली . श्याम मानव हे अखिल भारतीय संस्थापक संघटक होते . पहिले अध्यक्ष प्रा . चंद्रशेखर पांडे , तर कार्याध्यक्षाची जबाबदारी सुप्रसिद्ध विचारवंत प्रा . भा.ल. भोळे यांच्याकडे होती . उमेशबाबू चौबे , रूपाताई कुळकर्णी , हरीश देशमुख , नागेश चौधरी , सुधाकर चौधरी , सुरेश अग्रवाल ही मंडळी पदाधिकारी होती . अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उल्लेख आला की अनेकांच्या डोळ्यांसमोर बुवा -महाराजांचा भंडाफोड एवढीच एक गोष्ट येते . मात्र शेकडो भंडाफोड केले तरी नवनवीन बुवा – महाराज तयार होतच राहतात हे लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य माणसाला विवेकी बनवणे . त्याला तर्क व बुद्धीने विचार करण्याची सवय लावण्याची आवश्यकता समितीच्या लक्षात आली . अंधश्रद्धांची निर्मिती का होते ?, माणसं ढोंगी , बुवा -महाराजांना शोषणाला बळी का पडतात ? महिलांचे देव -धर्माच्या नावाखाली लैंगिक शोषण का होते , याचा सखोल अभ्यास करून प्रा . श्याम मानव यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळांची आखणी केली . मानवी मेंदू , मन कसे काम करते हे लक्षात घेऊन स्वसंमोहन व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा , कौटुंबिक स्वास्थ कार्यशाळा सुरू करण्यात आल्या . त्यातून विवेकी ब बुद्धीप्रामाण्यवादी कार्यकर्ते तयार होण्यास सुरुवात झाली . वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्री - पुरुषांनीही या कार्यशाळांचा लाभ घेऊन स्वत : च्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणलेत . अलीकडच्या काही वर्षात जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आग्रही आहे . जादूटोणाविरोधी - कायद्याचा मसुदा तयार करण्यात श्याम मानव यांचाच पुढाकार असल्याने त्यांनी अतिशय परिणामकारक पद्धतीने या कायद्याच्या विषयात पोलिस अधिकारी , कर्मचारी व व वेगवेगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले आहे . अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही या विषयात सखोल अभ्यास करून ग्रामीण भागात कायद्याविषयी प्रबोधन सुरु केले आहे . अंनिसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिवाची बाजी लावून समाजप्रबोधनासाठी स्वत : ला समर्पित केल आहे .
असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी दिली आहेत . अनेक कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा