भारत जोडो पदयात्रा व अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती सभे बाबत महत्त्वपूर्ण सूचना
खा. राहूल गांधी यांनी सुरु केलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेला हळूहळू सर्व स्तरातून सर्वव्यापी प्रतिसाद मिळत आहे.देशभरातून दोनशेवर सामाजिक चळवळींनी पदयात्रेस पाठिंबा दिला आहे .महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे नंतरची ही सर्व वर्गातून पाठिंबा प्राप्त होणारी पहिली पदयात्रा आहे .
17 व 18 नोव्हेंबर रोजी सदर यात्रा अकोला जिल्ह्यातून जात आहे . या पदयात्रेत अ.भा. अंनिसचे संस्थापक राष्ट्रीय संघटक प्रा.श्याम मानव, राष्ट्रीय अध्यक्ष मधुकरजी कांबळे, कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रवी खानविलकर, राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख, राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, महाराष्ट्र महिला संघटिका छाया सावरकर, सचिव प्रशांत सपाटे, महाराष्ट्र युवा संघटक पंकज वंजारे,विकास झाडे आदी कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत .
----------*----*---------
भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ इच्छित असलेल्या कार्यकर्त्यांकरिता सूचना
1) यात्रेत आपली इच्छा असेल तरच सहभागी व्हावे.
2) यात्रेत स्वखर्चाने सहभागी व्हावे लागेल. जाणे-येणे, निवास, नास्ता ,भोजन आदी खर्च स्वत: करायचे आहेत .
3) अकोल्यात थंडी असल्याने गरम कपडे, स्वेटर, टोपी- मफलर ,शॉल सोबत आणावी.
आपली गैरसोय होऊ नये म्हणून् तसेच भेटी, गप्पा चर्चा व्हाव्यात म्हणून अकोल्याचे टीम कडून खालील व्यवस्था करण्यात आली आहे
*निवास*
प्रती व्यक्ती - प्रती दिवस
₹ 250 .
*नास्ता*
प्रती व्यक्ती - प्रती दिवस
₹ 50
*चहा*
₹10
निवासाची व्यवस्था कृषक भवन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व हॉटेल नैवैद्यम अकोला येथे असेल.
चहा ,नास्ता , भोजन हॉटेल नैवैद्यम येथे असेल.
याला लागूनच शनिवार दिनांक 19 रोजी अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक आयोजीत करण्यात येत आहे. त्याची सूचना आपल्याला स्वतंत्र कळविण्यात येईल.
भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपली नावे
दिनांक 10 पर्यंत डॉ.स्वप्ना लांडे यांचे 7507581144
या नंबरवर कळवावीत.
सोईकरिता भारत जोडोचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येईल. सदर ग्रुप दिनांक 19 रोजी बंद करण्यात येईल.
नाव देताना आपण कधी येणार? कधी परत जाणार? कळवावे. नंतर भारत जोडो ग्रुप वर निवास, नास्ता, जेवणाचे पैसे पाठविण्याबाबत कळविण्यात येईल.
अ.भा. अंनिसची बैठकीचे दिवशी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा