अंधश्रद्धा छोडो यात्रा पंजाब
----------------------------
भारतीय बुद्धिवादी संघटनेचे पंजाब मध्ये बर्नाला येथे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे.देशातील सतरा राज्यातील बुद्धीवादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.या अधिवेशनात महाराष्ट्रातुन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकरा सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहे.यात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या चार दशक पूर्ती निमित्ताने गौरव गित सादर केले.समितीचे राष्ट्रीय महासचिव हरिश देशमुख, राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर, महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मनोहर हेपट, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख किरण जाधव, मुंबई चे अजित पाध्ये नागपूर जिल्हा समन्वयक भगवान खराते सहभागी झाले होते.या गिताला खंजीरीवर चंद्रकांत देशमुख व संगीताची साथ निलेश पाटील यांनी दिली. जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा