अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२

खडे वाला बाबाचा भांडाफोड



खडेवाला वाला बाबा 

'साधारण ९४ ते ९५ साल दरम्यानचं साल असावं...मुंबईतील अनेक रोडवर बाबा पाण्याच्या प्लास्टिकचे छोट्या बादल्या ,राशींचे खडे,अंगठ्या मांडून बाबा चमत्कार दाखवून रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फसवण्याचा धंदा मांडून बसू लागले होते... 

आज आठ दिवस झले रोज मी अजमेर वाल्या बाबाच्या मागावर होतो. रोज सकाळी हॉपीसला जाताना तासभरतरी  त्याच्या चमत्कार करण्याच्या पद्धतीवर बारीक लक्ष ठेऊन आसायचो. त्याच्या बरोबर कॊण कोण आहेत ,ह्यासर्वांचं बारीक सारीक निरीक्षण करत होतो.पण त्याची हातचलाखी माझ्या लक्षत येत न्हवती.अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हातचलाखी करत होता ...   धिपड साधारण सवासफुट उचं, छतीवर रुळणारी दाढी अंगात पंढरा कुर्ता , वर काळ हाफ जॅकेट ,डोक्याला हिरवा कपडा गुंढाळलेला कमरेला बारीक चौकडीची लुंगी, गळ्यात वेवेगळ्या मोठाल्या रन्गीबेरंगी मण्यांच्या माळा,भेदकनजर. असा हा अजमेरवला मुस्लिम बाबा लोअरपरेलच्या ब्रिजवर बसून लोकांना चमत्कार दाखवून गंडवण्याचा धंदा मांडून बसला होता . त्याची चमत्का करण्याची पद्धत अनोखी होती ..

समोर बसेल त्या व्यक्तीच्या हाताखाली जमिनीवर एक तांब्याच्या कलशावरील झाकणावर एक जुनाट तांब्याच नाणं ठेवायचा त्यावर त्याच्या जवळील गुळगुळीत राशींचा खडा किंवा अंगठी त्यावर ठेवायचा आणि  त्यावर हात न टेकवता हवेत, समोरच्या बसलेल्या व्यक्तीला तळहात वर करून त्या वर प्रथम चमच्याने दूध टाखयचा  आणि नंतर बाजूच्या प्लस्टिक च्या बादलीतल स्वछ पाणी सोडायचा ,खालील रंगिबिरंगी खडे दोनच्यार वेळेस बद्दलवायचा. एखाद्या वेळीस हातावरील पाणी गुलाबी रंगाचे व्हयचे बस लेल्या व्यक्तीला आचार्य वाटायचे ,त्याच्या चेहयावरील हे भाव हेरून बाबा " ये पथ्थर आपके राशिका है इसे पाहननसे आप की सारीपरशानीया  सारे दुख दर्द दूर होजयेंगे, नोकरी धंदेने कारोबर में बरकत आजायेगी, अपकी सारी परेशानीयां दूर होजायेगी " अस सँगून अनेक लोकांना त्यानीं गंडवल अनेक जाणारे येणारे लोक  त्याच्या चमत्काराला भुलून तीन ,चारशे रुपयांना त्याला देऊन राशींचे खडे अंगठ्या त्या कडून घेत होती. आणि वा काय बाबा आहे असंम्हणत बाबाची स्तुती करून त्यानें केलेल्या चमत्काराचे गोडवे गात निघून जात होते ... 

गेली आठ दिवस मी त्याचं निरीक्षन करीत होतो , पाणी गुलाबी का होत ? याचं रासायनिक करणं माहित होत, त्याचे अनेक प्रयोग अनिसच्या झाहिर कर्यक्रमातून करत होतो, हे माहीत होतं पण ते मिक्स करण्याचीत्याची पध्द्त मात्र त्याची अनोखी होती आणि तेच तर मला शोधायचं होत अनीती सहज लक्षात येत न्हवती त्यामुळे अनेक बाबा रस्तो-रस्ती हे चमत्कार करून खडे विकत होते ....एक दिवस असाच हॉपीस सुटल्यावर घरी निघालो असता बाबा भोवती पडलेल्या गराड्यात उभा राहिलो त्याच चमत्कर करण्याचा प्रयोग सुरु होता. आणि अचानक माझ्या नजरेला त्यचि हातचलाखी सापडली , मी आणखी थोडा थांबलो आणि पक्की खात्री करू घेतली... आणि बाबा ला एक्स्पोझ  करयच प्लॅन नक्की करून पुढील कमाला लागलो...

नुकत्याच दोन, तीन फसलेल्या माणसांना जातांना गाठलं त्यानां तम्ही कसे फसलात हे समजवायचा प्रयत्न केला, त्यातील एकानं मला मुर्खात काढून निघेऊन गेला दोघांना माझ्या बोलण्यात तथ्य जाणवलं त्यांना जवळच्या  पणाच्या टपरीवर नेहून चुना हाताला लावून माझ्या पाकिटातील पर्गोल्याक्सची पावडर त्याच्या हाताला चोळून चमत्कार करून दाखवला. ते त्यांची पक्की खात्री झाली.  आपण फ़सलोय दोघानी चारशे चारशे रुपयांना खडे घेतले होते बाबाला लाखोली वाहू लागले ते तेथील जवळपास रहाणारे असावेत. ते म्हणू लागले  'आमच्या सोबत चला त्या बाब ला आपण चोप देऊ उठून लावू ' वैगरे वैगरे ... पण असा आततायी पण करणे योग्य न्हवतं, प्रसंग काहिही घडला असता रस्त्यात हाणामारी झली असती, सगळ्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी बाबाला बेदम मारलं असतं, आणि मी एकटाच असल्यानं लोकांना आवरण कठीण गेलं असतं आणि असं होऊ नये यासाठी त्यांची कशी बशी समजूत काढून समजावून जवळच असलेल्या बीडीडी चाळीतील मंगेश पवार आणि इतर आपल्या नवीन कार्यकरत्यांना बरोबर घेतल. आणि बाबाला गाठलं त्यातील एक दोघाच्या हाताला पर्गोलैक्स ची पावडर चोळून बाबा च्या समोर बसवलं. बाबानी सराईत पणे वाटीतील दुध पळीने हातावर सोडताच हात लाल झाला. आणि बाबाच्या तोंडावरील भाव पहाण्या जोगे झाले त्याला काय बोलावं ते सुचेना स्वछ पाणी हातावर सोडण्या अगोदरच हातातील सोडताच दुध कसकाय लाल झाला हे पहाणारी जमावातील मानसही अवाक झाली . तेवढ्यात बाबाने सावरायचा प्रयत्न केला ... " अपने कूच दावाई खाई है इसलिये ऐसा हुवा ,नाही तो ऐसा नही होता " मी ' ठीक है इसने दावाइ खाई, है तो दुसरा आदमी बैठे गा हिसके हातपे अपका चमत्कार करके दिखावो ' दुसऱ्या कर्यकर्त्याला बसवलं त्या च्या हातवर दूध सोडताच त्याचाही हातील दूध गुलाबी रंगाचं झालं झाल आणि बाबा समजून गेला काहीतरी गडबड नक्की होणार आहे हे ओळखून आम्हालाच दमात घेऊन .. ' क्या मजाक लगाय है आप लोगोने दवा हात को लगाकर आयेहो '... असं काही बाही ओरडून बोलू लागला दुसरं कोण असत तर त्या धिपाड बाबाचा अवतार बघून नक्कीच पळ काढला असता... एव्हाना रस्ताने जाणारी येणारी अनेक माणसं जमा झाली होती. हि पोर ह्या बाबाशी काय गोंधळ घालतात ते पाहू लागली होती . आणि आंम्हालाही मागे हटन शक्य न्हवत ..  मग बाबाला मीच दमात घेतलं ' बस हो गया तुम्हारा नाटक येसबा उठाओ और हमारे सात पोलीस स्टेशन चलो ' बाबा :' हा हा चलो मैने क्या गुन्हा किया हैक्या चलो ' म्हणतं बाबा उठला आपला गाशा आवळू लागला ... मनात म्हणालो आता मात्र लंचांड आहे. ह्याला पोलीस स्टेशन मध्ये न्ह्यायचे  शिवाय ते दोघे फसलेले कुठे गर्दीत दिसेनात आत्ता काय करावे ते जर पोलीस टेंशन मध्ये आले नाहीतर पुन्हां गडबड होईल .. शेवटी त्याला पुन्हा ठेवणीतला दम दिल्हा ' पोलीस टेंशन मे येसबा करके दिखाना पडेगा, वांह तुम्हारा ये सब समान चेक करेंगे ,सब ,अगर कूच गडबड होगया  तो तू छह महिना अंदर जरूर जायेगा ' हि माझी मात्रा लागू पडली, एव्हढा मोठा बाबा गया वाया करू लागला , पाय धरू लागला ,रडण्याचं नाटक करू लागला एव्हढ्या मोठ्या धडधाकट बाबा गयावया करूलागला आणि एवढा वेळ कुठे दिसेनासे झालेले ते दोघे येऊन बाबाला मारण्याची भाषा करू लागले ,शिवी गाळ करू लागले ,पैसे परत मागू लागले ... बाकीच्या कर्यकर्त्यांनी त्या दोघानां आवरलं बाबाला त्या दोघाचे पैसे परत करण्यास सांगितले . तेवढ्यात आधल्या दिवशी फसलेले दोन तीन जण  हातात अंगठी दाखवून म्हणाले आम्हांलाही यान फसवलं त्यांची समजूत काढून त्यानां गप्प केलं . जमलेल्या लोकांना तो  काय चमत्कार करत होता ते त्याच सामान साहित्य घेऊन सप्रयोग करून दाखवून समजावून सांगितलं . आणि बाबाला तंबी दिली ' धट्टे कट्टे हो कुछ कंमधंदा करो, लोगोंको उल्लू बनानेक धंदा छोड दो, और यहाँ वापस बैठो मत अभी छोड रहा हूँ  वापस ईधर दिखाई दियेतो सीधे पोलीस स्टेशन लेके जाऊंगा'. ' बाबा केविलवाणी म्हणाला नाही साहब हम यहाँ नाही रुकेंगे हम अजमेर चले जायेंगे '.... सर्व गाठोडं आवळून पाठीवर मारून रेल्वेस्टेशन कडे रवाना झाला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतिकडे पाहून मनात विचार करतहोतो. मला त्याची एकीकडे दयाही येत होती ह्या धक्काधकीच्या जीवनात लोक पोट भरण्या साठी कोण कोणत्या क्लुप्त्या करतात असतात... त्याला कोणी मरणार तर नाहीना हे पहात तो जाई पर्यंत आम्ही उभेच होतो. तो रेल्वे स्टेशनच्या गर्दीत दिसेनासा झाला आणि आम्ही निघालो... 

तो काय चमत्कार करत होता - हातावर चुण्याचे पाणी दूध म्हणून सोडायचा , वरून स्वछ पाणी टाखान्याच्या बहाण्याने, प्लस्टिकच्या बदलीच्या काठात जिथे बदलीची कडी लावलेली असते तेथे आतल्या प्लस्टिकच्या ठोकळ्याच्या  बाजूला परगोलीक्स गोळीच्या पाऊडरचा गोळा चिटकून दडवलेला असतो. बदलीवर बाबाचा हात असतो बोलण्यात इतर लोकांचं लक्ष वेधून हळूच अंगठा  पाऊडरच्या गोळ्याला चिटकून अंगठा सोडून चार बोटानें पाणी घेऊन समोरील व्यक्तीच्या हातावरील चुन्याच्या पाण्यावर अंगठ्या वरून सोडलं कि पाणी गुलाबी होते. परगोल्याक्स मधील फिनॉल थेलिन नावाच्या केमिकलच आणि चुन्याचं पाणी एकत्र आले कि पाणी गुलाबी होते .... 

- सूर्यकांत जधाव

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

भारत जोडो पदयात्रा


भारत जोडो पदयात्रा व अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती सभे बाबत महत्त्वपूर्ण सूचना

खा. राहूल गांधी  यांनी सुरु केलेल्या  कन्याकुमारी ते काश्मीर  पदयात्रेला हळूहळू सर्व स्तरातून सर्वव्यापी प्रतिसाद मिळत आहे.देशभरातून दोनशेवर सामाजिक चळवळींनी पदयात्रेस पाठिंबा दिला आहे .महात्मा गांधी व  विनोबा भावे यांचे नंतरची ही सर्व वर्गातून पाठिंबा प्राप्त होणारी पहिली पदयात्रा आहे . 
 17 व 18 नोव्हेंबर रोजी सदर यात्रा अकोला जिल्ह्यातून जात आहे . या पदयात्रेत अ.भा. अंनिसचे संस्थापक राष्ट्रीय संघटक प्रा.श्याम मानव, राष्ट्रीय अध्यक्ष मधुकरजी कांबळे, कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रवी खानविलकर, राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख, राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, महाराष्ट्र महिला संघटिका छाया सावरकर, सचिव प्रशांत सपाटे, महाराष्ट्र युवा संघटक पंकज वंजारे,विकास झाडे आदी कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत  .
              ----------*----*---------
भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ इच्छित असलेल्या कार्यकर्त्यांकरिता सूचना 

1) यात्रेत आपली इच्छा असेल तरच सहभागी व्हावे.

2) यात्रेत स्वखर्चाने सहभागी व्हावे लागेल. जाणे-येणे, निवास, नास्ता ,भोजन आदी खर्च स्वत: करायचे आहेत .

3) अकोल्यात थंडी असल्याने गरम कपडे, स्वेटर, टोपी- मफलर ,शॉल सोबत आणावी. 

आपली गैरसोय होऊ नये म्हणून् तसेच भेटी, गप्पा चर्चा व्हाव्यात म्हणून अकोल्याचे टीम कडून खालील  व्यवस्था करण्यात आली आहे 

*निवास*
प्रती व्यक्ती - प्रती दिवस 
 ₹ 250 .

*नास्ता*
प्रती व्यक्ती - प्रती दिवस 
₹ 50

*चहा*
₹10

निवासाची व्यवस्था कृषक भवन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व हॉटेल नैवैद्यम अकोला येथे असेल. 

चहा ,नास्ता , भोजन हॉटेल नैवैद्यम येथे असेल. 

याला लागूनच शनिवार  दिनांक 19 रोजी अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक आयोजीत करण्यात येत आहे. त्याची सूचना आपल्याला स्वतंत्र कळविण्यात येईल.

भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपली नावे
दिनांक 10 पर्यंत डॉ.स्वप्ना लांडे यांचे  7507581144 
या  नंबरवर कळवावीत.
सोईकरिता भारत जोडोचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येईल. सदर ग्रुप दिनांक 19 रोजी बंद करण्यात येईल. 

नाव देताना आपण कधी येणार? कधी परत जाणार? कळवावे. नंतर भारत जोडो ग्रुप वर निवास, नास्ता, जेवणाचे पैसे पाठविण्याबाबत कळविण्यात येईल.
अ.भा. अंनिसची बैठकीचे दिवशी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही .

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

अंधश्रद्धा छोडो यात्रा पंजाब


 
अंधश्रद्धा छोडो यात्रा पंजाब

----------------------------
भारतीय बुद्धिवादी संघटनेचे पंजाब मध्ये बर्नाला येथे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे.देशातील सतरा राज्यातील बुद्धीवादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.या अधिवेशनात महाराष्ट्रातुन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकरा सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहे.यात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या चार दशक पूर्ती निमित्ताने गौरव गित सादर केले.समितीचे राष्ट्रीय महासचिव हरिश देशमुख, राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर, महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मनोहर हेपट, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख किरण जाधव, मुंबई चे  अजित पाध्ये नागपूर जिल्हा समन्वयक भगवान खराते सहभागी झाले होते.या गिताला खंजीरीवर चंद्रकांत देशमुख व संगीताची साथ निलेश पाटील यांनी दिली. जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
अभाअंनिसचे ४० वर्षपूर्ती निमित्ताने पंजाबच्या बर्नाला येथे अंनिस गौरव गित