शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३
सोमवार, १६ डिसेंबर, २०१३
पेनड्रायव्ह्यू, CD , DWD, ला द्या सुटी आणी करूया इंटरनेटवर अमर्याद मोफत जागेचा ( फ्री स्पेस ) उपयोग"
शनिवार, १४ डिसेंबर, २०१३
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा रत्नागिरी यांचे विद्यमाने ''आकाश दर्शन''
भविष्याच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा चालविण्यासाठी उभारलेली एक फसवी यंत्रणा !.- आनंद घैसास (वैज्ञानिक, होमी भाभा केंद्र, टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई )
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा रत्नागिरी यांचे विद्यमाने ''आकाश दर्शन'' हा कार्यक्रम दि १३डिसेंबर २०१३ रोजी वीरमाता जिजामाता उद्यान थिबापेलेस रत्नागिरी येथे विद्यार्थी , शिक्षक व सुजाण पालक यांच्या भरघोस उपस्थितीत अत्यंत उत्साहाने पार पडला.
कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री.आनंद घैसास (वैज्ञानिक, होमी भाभा केंद्र, टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई ) यांना पाचारण करण्यात आले होते. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक,पालक यांना अद्ययावत अशा ७ दुर्बिणींच्या माध्यमातून आकाश दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. तसेच श्री. आनंद घैसास यांनी आपल्या ओघवत्या शैलीत दृकश्राव्य माध्यमातून आकाशातील ग्रह व ताऱ्यांची माहिती दिली.
श्री. आनंद घैसास यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करतांना फलज्योतिष कसे थोतांड आहे याचे विवेचन केले. फलज्योतिष हा धंदा असून कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांचे भाकित ज्योतिषांना करता येत नाही असे सांगतांना त्यांनी अनेक घटनांचे पुरावे दिले. जन्मकुंडलीतील ग्रह मांडून एखाद्या व्यक्तीचे जन्मदिवस-ठीकाण निश्चित करता येते परंतु राशीनुसार मानवी जीवनावर ग्रह गोलांचे होणारे कोणतेही अनिष्ट परिणाम हे केवळ असत्यच नाही तर बेमालूम थाप आहे, भविष्याच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा चालविण्यासाठी उभारलेली एक फसवी यंत्रणा आहे. आजच्या आधुनिक काळात भविष्यावर विश्वास ठेवणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेणे होईल. तरीही आजच्या आधुनिक समाजात फलज्योतिषावर विश्वास वाढतांना दिसतो. भविष्य कथनावर, कुंडल्यांवर,त्यांची कसलीही तपासणी न करता प्रसिद्धी माध्यमे प्रसिद्धी देतात त्यामुळे आंम्ही वैज्ञानिक अस्वस्थ आहोत. या परिस्थितीची परिणती अतार्किकता व भोंगळवाद वाढविण्यात असल्याने या अंधश्रद्धा झुगारण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत श्री. आनंद घैसास यांनी व्यक्त केले.
- विवेक घाटविलकर (सदस्य - अ.भा.अ.नि.स.)
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतांना मान. आनंद घैसास सर ..
4 · 3 hours ago
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३
Good NEWS ! State Level Camp Of AB Andhashraddh Samiti
शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१३
जादूटोणा विरोधी कायदा समज व गैरसमज
लवकरात लवकर नवीन पुस्तिका डाउनलोड साठी लोड जाईल .
मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३
महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांवरील खुनी भ्याड हल्ला
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि `साधना` साप्ताहिकाचे
संपादक '' डॉ. नरेंद्र दाभोळकर "
बुधवार, २२ मे, २०१३
अंधश्रद्धा निर्मूलन सखोल प्रशिक्षण शिबीर
दोन दिवसीय सखोल प्रशिक्षण शिबीर
"भूत" म्हणजे काय ? खरोखर ते असते का ?
भानामती, होते काय ?
जोतिषांना खरोखरच तुमचं, आमचं भविष्य सांगता येत का ?
मंत्रतंत्र, जादूटोणा, करणी, यांनी माणसे मरतात काय ?
या विषयांची वैज्ञानिक दृष्टीकोना तून माहिती मिळूया .
वैज्ञानिक दृष्टीकोन, बुद्धीप्रमाण्यावाद, ज्योतिष्य, देवी अंगात येणे इत्यादी व इतर अनेक बौद्धिक चर्चा व प्रश्नोत्तरे ...
वक्ते- प्रा. श्याम मानव, दिलीप सोळंके, गणेश हलकारे, संदीप पवार, रविंद्र खानविलकर, चंद्रकांत सर्वगोड ई.
दिन- १ जुन २०१३ सकाळी १० ते सायं. ७ पर्यंत (दिवस पहिला)
२ जून २०१३ सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत (दिवस दुसरा)
शुल्क- रु. २५० सर्वांसाठी
व रु. २०० विद्यार्थ्यांसाठी (२१ वर्षाखालील)
अधिक माहितीसाठी संपर्क-
संदीप- ८२८६९४९४९५, ९९६७८३४८३१
शशी- ९८६९७३७९३०, ९८३३६३४०६२
चंद्रकांत- ९३२३११६९५०
शनिवार, ६ एप्रिल, २०१३
मंगळवार, २ एप्रिल, २०१३
मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३
शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१३
मंगळवार, ८ जानेवारी, २०१३
वैज्ञानिक दृष्टीकोनातून व्यक्तिमत्व विकास शिबीर
|
|
|