अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

जागतिक महिला दिनानिमित्त जाहीर व्याख्यान व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण.

दि.6 मार्च 2026

जागतिक महिला दिनानिमित्त जाहीर व्याख्यान व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

ठाणे : जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे जाहीर व्याख्यान व निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, ८ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC) अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ज्योती ढोकणे राहणार असून, प्रमुख व्याख्यान मा. मोनिका काळे यांचे होणार आहे. त्या “बाई, पारख तुझ्या क्षमतेची!” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी मा. वनिता हरमळकर (मुख्याध्यापिका) प्रमुख उपस्थिती म्हणून सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन मा. नीता डुबे (महिला संघटिका, अ.भा. अंनिस, ठाणे) यांनी केले असून, कार्यक्रमात  संगीता सराफ (स्त्रीमुक्ती संघटना)  उपस्थित राहून महिलांशी संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितिच्या ठाणे टीमने केले आहे.

हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दत्तवाडी, खरेगाव, कळवा (पश्चिम), ठाणे येथे होणार आहे.

महिला सक्षमीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समिती कडून करण्यात येत आहे.
🌞✍️

---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा