सोमवार, ८ डिसेंबर, २०१४
"चारशे वर्षांच्या भीतीला प्रबोधनाचे अभय"
"चारशे वर्षांच्या भीतीला प्रबोधनाचे अभय"
- पुरुषोत्तम आवारे पाटील - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 डिसेंबर 2014 - 01:45 AM IST
- पुरुषोत्तम आवारे पाटील - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 डिसेंबर 2014 - 01:45 AM IST
नाशिक - दर तीन वर्षांतून एकदा ग्रामदेवतेचा कोप होतो म्हणून संपूर्ण गावाच्या वेशीबाहेर तीन दिवस मुक्काम करण्याच्या आचरा (ता. मालवण) येथील "गावपळन‘ प्रथेला रोखण्याचा प्रयत्न अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रविवारी (ता. 7) केला. दैवी कोपाच्या भीतीने गेली चारशे वर्षे ही प्रथा पाळली जात होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा (ता. मालवण) या पाच हजार लोकवस्तीच्या गावात तीन वर्षांतून एकदा ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराचा कोप होतो, त्यामुळे तीन दिवस किंवा देवाचा पुढील आदेश होईपर्यंत गावात कुुणीही राहत नाही. गाव ओस पडते. ग्रामदैवतेला इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानचे विश्वस्त कौल लावतात. त्यातून "गावपळन‘ करण्याची तारीख निश्चित केली जाते. यंदा 7 ते 9 डिसेंबर हा काळ त्यासाठी कौलद्वारा निश्चित करण्यात आला होता. आज दुपारी दोनला गाव सोडण्याचा आदेश संस्थानने जारी केला होता. या काळात गावात कुणी थांबल्यास दैवी कोप होतो, अशी आख्यायिका असल्याने दुपारपर्यंत तीन हजारांवर लोकांनी गाव सोडले होते.
दरम्यान, या प्रथेच्या विरोधात जनजागृती करण्याचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काल (ता. 6) जाहीर केले होते. जनतेच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांसह या काळात गावात मुक्कामी राहणार असल्याचे "अंनिस‘चे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ते आपल्या 20 सहकाऱ्यांसह सकाळी आचरा गावात दाखल झाले. त्यांनी शाळेच्या प्रांगणात प्रबोधन करून या प्रथेला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे सांगून, लोकांनी निर्भय बनून गावातच थांबण्याचे आवाहन केले.
दरम्यान, या प्रथेच्या विरोधात जनजागृती करण्याचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काल (ता. 6) जाहीर केले होते. जनतेच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांसह या काळात गावात मुक्कामी राहणार असल्याचे "अंनिस‘चे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ते आपल्या 20 सहकाऱ्यांसह सकाळी आचरा गावात दाखल झाले. त्यांनी शाळेच्या प्रांगणात प्रबोधन करून या प्रथेला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे सांगून, लोकांनी निर्भय बनून गावातच थांबण्याचे आवाहन केले.
दुपारी एकला प्रा. मानव व त्यांच्या सहकाऱ्यांना "आमच्या या श्रद्धेच्या विषयात हस्तक्षेप करू नका‘, असे सांगत संस्थानच्या भाविकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. प्रशासन आणि पोलिसही प्रा. मानव यांना गाव सोडण्याची विनंती करीत होते. मात्र सायंकाळी साडेपाचपर्यंत "अंनिस‘ने गावातच तळ ठोकला. या वेळी दीड हजारावर नागरिक उपस्थित होते. अनेकांनी आम्ही गावातच राहणार असल्याचा निर्धार केला. पोलिसांच्या विनंतीला मान देऊन सायंकाळी "अंनिस‘ कार्यकर्ते बाहेर पडले. दोनला गाव सोडण्याचा देवाचा आदेश होऊनही लोक गावात उपस्थित राहिल्याने आमचा उद्देश सफल झाल्याची प्रतिक्रिया प्रा. मानव यांनी "सकाळ‘शी बोलताना दिली.
शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४
मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४
वक्ता - प्रशिक्षक प्रशिक्षण शिबीर
महाराष्ट्र शासन आणि
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग ,समाज कल्याण आयुक्तालय ,महाराष्ट्र शासन पुणे
जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती ,प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अमलबजावणी समिती
Program Implementation &Monitoring Committee-PIMC
वक्ता प्रशिक्षण शिबीर नाशिक देवळाली एथे दि.२९अक्टो ते २ नोव्हें संपण झाले.
शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४
बुधवार, २३ जुलै, २०१४
ज्योतिष्यांनो, या १४ प्रश्नांची उत्तरे द्या!
ज्योतिष किती खरे? किती खोटे? फलज्योतिष विज्ञान आहे काय? या विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव आणि ज्योतिष महामंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आज खामगावात आमनेसामने भिडणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी खामगावातील नॅशनल हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी ५.३0 वाजता हे आयोजन केले आहे. गेल्या २५ वर्षांत ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते सिद्ध करा आणि १५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवा, हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारण्यासाठी कुठलाही ज्योतिषी वा ज्योतिषी महामंडळाचा पदाधिकारी पुढे आला नाही. त्या पार्श्वभूमीवर नंदकिशोर जकातदारांनी ज्योतिष हे विज्ञान आहे? या विषयावर बोलण्याची तयारी दाखविली, हे महत्त्वाचे आहे. अंनिसच्या वतीने जगभरातील ज्योतिष्यांना सोबतच्या लेखातील १४ प्रश्न नेहमी विचारले जातात. आजपर्यंत त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं कोणीही देऊ शकले नाहीत. बघूया आज काय होते ते.- संपादक१) फलज्योतिष हे शास्त्र आहे का? २) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ-कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का? ३) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का? ४) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात १९ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशना'चे काय मत आहे? ५) आजचे फलज्योतिषी ९ (किंवा १२) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणा?र्या कुंडल्या किती विश्वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणा?र्या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो? ६) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये? ७) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही
सरकारला करावी काय? ८) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही? ९) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणा?र्या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळय़ा वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? १0) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षांनंतर तो निश्चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? ११) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गभर्पात करतो व जन्माला येणा?र्या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? १२) मृत्यू ठरलेला असतो का? अ) तो जर ठरलेला असेल तर, १९३0 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ १८ वर्षे होते. आता ते ६८ वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाट्याला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रय▪करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळय़ांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळय़ाच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय? १३) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही? १४) दोनदा २0-२0 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे ९0 टक्क्यांपेक्षा अधिक ९५ टक्के अचूक निघायला हवीत, तर १५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या ९0 टक्के ख?र्या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते ९0 टक्के अचूक निघावीत. १५ लाख मिळतील; पण ७0 टक्के जरी खरी निघाली (दोनदा २0-२0) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का?
(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)
भ्रमणध्वनी - ९३७१0१४८३२
मंगळवार, २० मे, २०१४
प्रर्यावरण
|
बुधवार, ७ मे, २०१४
सोमवार, २१ एप्रिल, २०१४
मंगळवार, ११ मार्च, २०१४
सावरकरांचा सामाजिक समरसतेचा विचार समाजात मांडावा
|
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४
अ. भा. अंधश्रध्दा निर्मूलन समिती - मुंबई विभाग
अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती १९८२ पासून संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, छतत्तिगड, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान इ. प्रदेशात जनप्रबोधनाचे कार्य सातत्याने करीतआहे.
वैज्ञानिक दृष्टीकोण समाजात रुजावा आणी अंधश्रध्दा पासून समाजाला दूर कराव ह्यासाठी
समितीने जिल्हा - तालुका - गाव पातळीवर काम करण्याचे ठरवले असून, प्रतेक ठिकाणी स्थानिक कार्यकारणी निवडण्यात एईल प्रतेक कार्यकारणीत
१) अध्यक्ष २) संघटक २) सचिव
हि तीन पदे प्रमुख्याने निउक्त करण्यात अेतील .
त्या नंतर कार्यकर्त्यांच्या संखे नुसार आणि कामाच्या पहाणीनुसार कार्यकारणी वाढवण्यात येईल .
कार्यकारणीणे पुढील उपक्रमांची आखणी करून समितीच्या राष्ट्रीय पातळीवरील
पदाधिकार्यांशी संपर्क करावा
मधुकर कांबळे - ९९३०३१२४९४
पुरूषोत्तम आवारे -९८९२१६२२४८
समितीच्या कामाच्या अधिक माहिती साठी समितीच्या ब्लॉगला आणि
शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४
photo presentation
andhsrdha nirmulan smitichya mumbai vibhagatil karykartyanchye junya photonche presentation
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०१४
बुधवार, १९ फेब्रुवारी, २०१४
WORKSHOP FOR RESOURCE PERSON ON " EXPLAINING SCIENCE BEHIND MIRACLES "
सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४
andhashraddha nirmulan 3 Day Shibir, Mangaon 8-9-10/11/2013
माणगाव इथे ८ ,९ , १० तीन दिवसीय शिबिरातील
काही क्षण चित्रे
कार्यकर्त्यांना हि प्रवेश शुल्क भरून नोदणी करावी लागते.
सुरेअन ,शशी , कैलास मोहिते , प्रशांत
रवींद्र खानविलकर
विलास कोळपे
तल्लीन श्रोते
गृप चर्चा
स्पुर्ती गीते
ग्रुप अेक्टीविटी पथनाट्या
ग्रुप अेक्टीविटी
ग्रुप अेक्टीविटी पथनाट्या
ग्रुप अेक्टीविटी
ग्रुप परिसंवाद
वैभव छाया
अभानिस ची एक- तोफ दिलीप सोलंकी
स्पुर्ती गीते - संदीप शिंदे
चंद्रकांत सर्वगोड
रात्र झाली तरीही तल्लीन श्रोते
नाटकाद्वारे खगोल शास्र - आनंद घैसास
आकाश निरिक्षन
संदीप पवार
गृप चर्चा
शिबिरार्थिचें मनोगत
पडद्या मागचे कलाकार- शशी गमरे
शिबिरार्थिचें मनोगत
शिबिरार्थिचें मनोगत
विधर्भ कर्यकरते - किशोर वाघ
अभानिस चे आधारस्तंभ - अरविंद पाटकर
एक निसर्ग संवदर्याने नटलेला परिसर
सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)