चिन्ह अनावरण समारंभ,प्रशिक्षण शिबीर संपन्न
मुंबई, मुंबई उपनगर ,ठाणे व रायगड जिल्हाच्या वतीने आयोजित 'एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर' व समितीच्या ४० वर्ष पुर्ति निमित्त 'चिन्ह अनावरण सोहळा' हा कार्यक्रम रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन ,सानपाडा, नवी मुंबई या ठिकाणी संपन्न झाला .
अ.भा.आनिसचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे यांच्या हस्ते ४० व्या वर्ष पुर्ति चिन्हाचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर ,महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी ४०व्या वर्ष पुर्ति च्या निमित्ताने समितीने केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांसमोर मांडली. या चिन्हाचे निर्माते कालाकार व समितीचे भांडाफोड प्रमुख सुर्यकांत जाधव हे या कार्यक्रमास उपस्थित होते . शिबीराचे उद्घाटन ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ.प्रकाश ढोकणे यांच्या हस्ते झाले.
प्रशिक्षण शिबीरात वैज्ञानिक दृष्टीकोन व महाराष्ट्र सरकारचा जादूटोणा विरोधी कायदा यांच्या प्रचार प्रसार यासाठी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
मुंबई संघटक चंद्रकांत सर्वगोड ,मुंबई सचिव अजित पाध्ये ,मुंबई-उपनगर संघटक सचिन हिंदळेकर ,उपनगर सचिव धनाजी जाधव ,ठाणे जिल्हा महिला संघटिका नीता डुबे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले . शिबीर नोंदनीसाठी प्रिती कुटे व हॉल व्यवस्था यासाठी विद्या सर्वगोड यांचे सहकार्य लाभले. आणि समारोप रायगड जिल्हा संघटक नरेंद्र जाधव यांनी केला.
विविध संस्थाचे कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात शिबीर संपन्न झाले.