अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

मंगळवार, २३ जून, २०२०

समुपदेशनाची वारी विद्यार्थ्यांच्या घरी

⭕ प्रा. श्याम मानव सरांच्या मार्गदर्शनात युवा शाखा - कार्यकर्त्यांची बैठक ⭕

★ समुपदेशनाची वारी व इतर उपक्रमांची देण्यात आली सविस्तर माहिती ★

     दि. 22 जून 2020 रोजी रात्री 8 वाजता विशेष Skype group वर प्रा. श्याम मानव सरांच्या मार्गदर्शनात युवा शाखा  - सक्रिय प्रमुख कार्यकर्त्यांची (कोअर गृप टिम)  बैठक आयोजित करण्यात आली होती.  
            महाराष्ट्र राज्य संघटक अ. भा.अंनिस - युवा शा. मा.पंकज वंजारे सरांनी सर्वप्रथम अ भा अंनिस संस्थापक -  राष्ट्रीय संघटक मा. प्रा. श्याम मानव सरांना गेल्या तीन वर्षात विदर्भात युवा शाखे द्वारे आयोजित शिबिर, उपक्रम, online व्याख्यानमाला, प्रबोधन अभियानासह समुपदेशनाची वारी विद्यार्थ्यांच्या दारी या सुरू असलेल्या वारी उपक्रमाचा उद्देश, तिचे स्वरूप सोबतच त्या अंतर्गत सुरू असलेली युवा संघटन बांधणी विषयीची थोडक्यात माहिती दिली.

त्या नंतर....
युवा शाखेद्वारा 1मे 2020 रोजी व्याख्यानमाला तसेच 9 मे 2020 रोजी सुरू करण्यात आलेल्या समुपदेशनची वारी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या दारी '1call स्वतःसाठी' या उपक्रमाचा जिल्हानिहाय अहवाल बैठकीत  सादर करण्यात आला. यात किती विद्यार्थी सहभागी झाले ? कोणत्या अडचणी आल्या,  कोण कोण मान्यवर, जेष्ठ पदाधिकारी , जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते व त्यांनी सदिच्छा- मार्गदर्शक केले याची इतंभूत माहिती सरांना देण्यात आली.  

यात...
● अ भा अंनिस बुलढाणा युवा शाखा संघटक अविनाश खिल्लारे यांनी बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या 3 दिवसीय वारीच्या सेशनचा अहवाल सादर केला. 
● अ.भा.अंनिस अमरावती जिल्हा सचिव हरीश केदार यांनी 
अमरावती येथे 4 दिवसीय समुपदेशनाची वारी विषयीचा अहवाल सादर केला. 
●अ. भ. अंनिस जिल्हा उपाध्यक्ष यु. शाखा नागपूर सुरेंद्र वानखडे यांनी नंदूरबार जिल्ह्यातील झालेल्या 2 दिवसीय  सेशन विषयी सविस्तर माहिती दिली.
●अ. भा.अंनिस यवतमाळ जिल्हा संघटक यु.शाखा तथा विचार प्रसार प्रमुख कु. सेजल शशिकांत फेंडर यांनी यवतमाळ 3 दिवस व गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसीय आयोजित   झालेल्या समुपदेशनाची वारी बद्दल सविस्तर अहवाल सादर केला. 
●अ भा अंनिस वर्धा  जिल्हा सहसंघटक यु. शाखा सुमित लता प्रकाश उगेमुगे यांनी वर्धा 2 दिवस व वाशीम येथे झालेल्या 3 दिवसीय शेषन विषयी अहवाल सादर केला.
● अ भा अंनिस नागपूर जिल्हा यु.शाखा संघटक श्रावण खुदरे यांनी नागपूर 2 दिवस व भंडारा  येथे झालेल्या दोन दिवसीय सेशन विषयी सविस्तरपणे मांडणी केली.
●अ.भा.अंनिस यु. शाखा राज्य उपक्रम  नियोजन व संपर्क प्रमुख हर्षाली लोहकरे यांनी चंद्रपूर - गडचिरोली दोन्ही जिल्ह्यात एकत्रित समुपदेशनाची वारीच्या दोन दिवसीय  सेशन बद्दल सविस्तर माहिती दिली..
   सोबतच पुढील काळात युवा शाखे द्वारे राज्य स्तरावर काय उपक्रम आयोजित केले जाणार आहेत व पुढील वाटचाल काय राहील या विषयी सविस्तरपणे मांडणी त्यांनी केली. 
● अ भा अंनिस नागपूर महानगर  सचिव यु. शाखा मंजुषा खुदरे मॅडम,

●अ भा अंनिस उत्तर महाराष्ट्र सम्पर्क प्रमुख नरेंद्र पाटील,

●अ भा अंनिस समुद्रपूर ता. युवा शा. संघटक तथा IT प्रमुख संजीत ढोके,

●अ भा अंनिस वर्धा युवा शाखा ई-सम्पर्क प्रमुख यु.शाखा अथर्व भिंगारे

●अ भा अंनिस देवळी ता संघटक यु. शाखा स्वप्नील सरडे यानी आपला परिचय देत आपल्या कार्याची माहीती दिली.
      प्रा. श्याम मानव सरांनी यावेळी बहुमुल्य, उत्साह वाढवणारे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या नंतर बैठकीत युवा शाखेच्या कोअर टीम सदस्यांनी मा. श्याम मानव सरां सोबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. मा. पंकज वंजारे सरांनी आभार मानले.

या नंतर बैठकीत  झालेल्या चर्चेत 
निलेश मीसाळ-जिल्हा संघटक युवा शाखा- वाशीम, युवराज राठोड - यु शा वाशीम, आशिष मोडक -ता. सचिव वर्धा, उमेश खर्डे- यु.शा तालुका संघटक बुलढाणा , निखिलेश चांबरे- जिल्हा संघटक युवा. शाखा चंद्रपूर, सोनिया डोंगरे -जिल्हा संघटक यु शा. भंडारा, प्रा. बालाजी दमकोंडवार- ता. संघटक ब्रह्मपुरी , विपस्तना सुरडकर चिखली ता. संघटक जि. बुलढाणा, रिंकेश भिसे, यु. शा. अचलपूर, राम देशमुख यु. शा. अमरावती, कांचन ठाकरे, यु शा. नागपूर, प्रज्वल निंबार्ते- भंडारा यु. शा. जिल्हा सचिव, प्रतिक्षा कापगते , यु शा साकोली जि भंडारा, वैभव माळी, जि. युवा शाखा संघटक नंदूरबार, तुषार चव्हाण गोंदिया, अमृता अदावडे -जिल्हा सचिव यु. शा नागपूर, प्रफुल बावणे यु. शा. उमरेड, अनिकेत कांबळे हिंगणघाट या सक्रिय युवा कार्यकर्त्यांना झालेल्या विशेष बैठकीचा अहवाल लवकरच ई- बैठक घेऊन सांगितला जाईल असे , बैठकीत शेवटी ठरले. 
यानंतर दोन तास चाललेली बैठक संपली. 

- हरिष केदार
जिल्हा सचिव अ.भा.अंनिस 
अमरावती

गुरुवार, १८ जून, २०२०



सदस्यता नोंदणी अभियान


चला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सामील होऊया !

सदस्यता नोंदणी अभियान 

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती

नोंदनी फक़्त 

३१ मे २०२० पर्यंत 


.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सभासद होण्यासाठी 

खालील लिंकवर जावून लगेच निःशुल्क फॉर्म भरून

 .भा.अंनिस चे सभासद व्हा


सदस्यता नोंदणी लिंक




समितीमध्ये नव्याने काम करू इच्छिाणाऱ्या  

प्रत्येकाने कृपया हा सदस्यता फॉर्म भरावा...

अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा !


समुपदेशनाची वारी विद्यार्थ्यांच्या दारी