शिबीर : जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती, मुंबई आणि कोकण विभाग आयोजित दि. १४, १५ व १६ नोव्हेंबर २०१५ रोजी अंधश्रद्धा निर्मूलनावर राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात समितीची भूमिका वा कार्य, अंधश्रद्देची निर्मिती, मंत्र तंत्र, जादूटोणा एक मायाजाल, बुवाबाजी बळी स्त्रियांचा, आत्मा-पुनरजन्म, आध्यात्म आणि विज्ञान, नशीब- फलजोतीश, सर्पविषयक अंधश्रद्धा इत्यांदी विषयावर सखोल माहिती तसेच बंगाली बाबा, बुवा, मांत्रिक-तांत्रिक , कौल लावणे इत्यांदी चमत्कारांची प्रात्यक्षिक आणि समोहनाचे काही प्रयोग यांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण शिबीर सकाळी ९.३० ते रात्री ८.00 वाजेपर्यंत राहणार असून तीनही दिवसांची भोजन, नाश्ता, चहा व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिरात १०० लोकांनाच प्रवेश देण्यात येईल. यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आपली नावे दि. ३० ऑक्टोबर पर्यंत शिबीर शुल्कासह संपर्क व्यक्तीकडे नोंदवावी हि नम्र विनंती.
:: संपर्क ::
रवींद्र खानविलकर : ९९६९१३१०९१, सुर्यकांत जाधव : ८१०८२३१२५५ संदीप पवार : ९८६७८३४८३१, कैलासचंद्र मोहिते : ९८६९१००६३७, आनंद साळकर : ९८२०६३२७५८, शशिकांत गमरे : ९८३३६३४०६२, लक्ष्मण गवळी : ९३२०८९३४१७, ज्ञानेश मावळे : ९८९२३९८९५२, सुजित केदारे : ८६८९८५०४३२, उदय सर्वगोड : ९२२०५०७७३०,
दि. १४, १५ व १६ नोव्हेंबर २०१५ राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर,
:: शिबीर स्थळ ::
कुष्ठरोग निवारण संस्था, शांतीवन नेरे, पनवेल.
शिबिरार्थींकरीता महत्वाच्या सूचना
शिबीर स्थळी : शनिवार,दि . १४ नोव्हे२०१५
रोजी सकाळी ९ .०० पर्यंत वेळेत हजर रहावे.
सोबत येताना चादर ,ब्याट्री , वही पेन आणावे.
शिबिराच्या सर्व सत्रांना हजर असणाऱ्या शिबिरार्थीनांच
प्रमाण पत्र देण्यात येईल.
१५ वर्षा खलील कोणालाही प्रवेश मिळणार नाही .
:: शिबीर रहिवाशी असून ,शिबीर शुल्क आकारले जाईल ::
शिबीर शुल्क रु. ६००/- ( रु .सहाशे फक्त ).
विध्यार्थ्यासाठी रु. ५००/- ( रु .पाचशे फक्त ).
:: टीप ::
विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजचे ओळख पत्र सोबत घेऊन येणे जरुरी आहे .
आणि इतर सर्व शिबिरार्थींनी ओळख पत्र सोबत घेऊन येणे जरुरी आहे.
For Online Booking request please visit
----------------
http://veadh.blogspot.in/