सोमवार, ८ डिसेंबर, २०१४
"चारशे वर्षांच्या भीतीला प्रबोधनाचे अभय"
"चारशे वर्षांच्या भीतीला प्रबोधनाचे अभय"
- पुरुषोत्तम आवारे पाटील - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 डिसेंबर 2014 - 01:45 AM IST
- पुरुषोत्तम आवारे पाटील - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 डिसेंबर 2014 - 01:45 AM IST
नाशिक - दर तीन वर्षांतून एकदा ग्रामदेवतेचा कोप होतो म्हणून संपूर्ण गावाच्या वेशीबाहेर तीन दिवस मुक्काम करण्याच्या आचरा (ता. मालवण) येथील "गावपळन‘ प्रथेला रोखण्याचा प्रयत्न अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रविवारी (ता. 7) केला. दैवी कोपाच्या भीतीने गेली चारशे वर्षे ही प्रथा पाळली जात होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा (ता. मालवण) या पाच हजार लोकवस्तीच्या गावात तीन वर्षांतून एकदा ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराचा कोप होतो, त्यामुळे तीन दिवस किंवा देवाचा पुढील आदेश होईपर्यंत गावात कुुणीही राहत नाही. गाव ओस पडते. ग्रामदैवतेला इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानचे विश्वस्त कौल लावतात. त्यातून "गावपळन‘ करण्याची तारीख निश्चित केली जाते. यंदा 7 ते 9 डिसेंबर हा काळ त्यासाठी कौलद्वारा निश्चित करण्यात आला होता. आज दुपारी दोनला गाव सोडण्याचा आदेश संस्थानने जारी केला होता. या काळात गावात कुणी थांबल्यास दैवी कोप होतो, अशी आख्यायिका असल्याने दुपारपर्यंत तीन हजारांवर लोकांनी गाव सोडले होते.
दरम्यान, या प्रथेच्या विरोधात जनजागृती करण्याचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काल (ता. 6) जाहीर केले होते. जनतेच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांसह या काळात गावात मुक्कामी राहणार असल्याचे "अंनिस‘चे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ते आपल्या 20 सहकाऱ्यांसह सकाळी आचरा गावात दाखल झाले. त्यांनी शाळेच्या प्रांगणात प्रबोधन करून या प्रथेला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे सांगून, लोकांनी निर्भय बनून गावातच थांबण्याचे आवाहन केले.

दुपारी एकला प्रा. मानव व त्यांच्या सहकाऱ्यांना "आमच्या या श्रद्धेच्या विषयात हस्तक्षेप करू नका‘, असे सांगत संस्थानच्या भाविकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. प्रशासन आणि पोलिसही प्रा. मानव यांना गाव सोडण्याची विनंती करीत होते. मात्र सायंकाळी साडेपाचपर्यंत "अंनिस‘ने गावातच तळ ठोकला. या वेळी दीड हजारावर नागरिक उपस्थित होते. अनेकांनी आम्ही गावातच राहणार असल्याचा निर्धार केला. पोलिसांच्या विनंतीला मान देऊन सायंकाळी "अंनिस‘ कार्यकर्ते बाहेर पडले. दोनला गाव सोडण्याचा देवाचा आदेश होऊनही लोक गावात उपस्थित राहिल्याने आमचा उद्देश सफल झाल्याची प्रतिक्रिया प्रा. मानव यांनी "सकाळ‘शी बोलताना दिली.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)