अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

आपला सहभाग अावश्यक


आपला सहभाग अावश्यक 


शिक्षणाचा प्रसार झाला आणि विज्ञानाचा वापर वाढला कि, अंधश्रधा 

अपोआप दूर होतील असा एक समाज स्वतंत्र्यानंतर रूढ होता. गेल्या काही  वर्षात यातील फोलपणा सर्वांच्या ध्यानात आला आहे .केवळ अशीक्षितांतच नव्हे तर सुशिक्षीतांमधेही दववादाचे व कर्मकांडाचे प्रस्थ वाढत आहे .काही  त्याज्य व अन्यायकारक रूढी - परंपराचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न होत आहेत .अंधश्रद्धांना विज्ञानाचा मुलामा देण्याची दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालू आहेत .मात्र समाजात एक वर्ग असा आहे कि, ज्याला दैववादाचे व  अंधश्रद्धांचे हे प्रस्थ अयोग्य वाटते .याविरोधात कोणी संघर्ष करत आहे असे दिसल्यास मदतीचा हात पुढे करण्यास तो उत्सुक असतो .आपण यापेकी आहात, याची आम्हाला खात्री आहे . अंधश्रधा निर्मुलन चळवळ आपल्या सहकार्याने वाढणार आहे .आपण अंधश्रधाच्या विरोधात असाल तर आमच्याबरोबर एक पाऊल टाका. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा