अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

प्राध्यापक म्हाषयच्या मंत्राने म्हने भुते शांत होतात ?

नागपूर -
 भुतांचे अस्तित्व सिद्ध करा आणि पंचवीस लाख रुपये बक्षीस मिळवा, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. भुतांच्या अस्तित्वाला मान्यता देणारे कानपूर येथील आयआयटी प्रोफेसर लक्ष्मीधर बेहरा समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे.

उच्चशिक्षित व्यक्ती जर भूत असल्याचे म्हणत असेल तर ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. मित्राच्या फ्लॅटमध्ये घरची मंडळी घुमारे करतात, ते आत्मे म्हणे प्राध्यापक बेहरा यांच्या मंत्राने शांत होतात. अशा गोष्टींमुळे भूत आहे, असे
म्हणणे चुकीचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यापूर्वी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शताब्दी. चौकानजीक चाफले ले- आउट येथे सीसीटीव्हीत भूत सापडले, या बाबीचा भांडाफोड केला होता. समितीचे पथक घटनास्थळी गेले, तेव्हा खरा प्रकार चौकशीत पुढे आला. त्या व्यक्तीच्या शेजारी रात्री इलेक्ट्रिक पोलवर शॉर्टसर्किट झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरा व्हायब्रेट झाला. त्यामुळे इमेज विकृत झाल्याने त्याला भूत संबोधित केले. चिकित्सा केल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला होता. भूत आहे, सिद्धतेला समितीचे २५ लाख रुपयांचे बक्षीस आहे. जगात कोट्यवधीचे बक्षीस आहे. अमेरिकेत 'दी कमिटी फॉर दी सायंटिफिक इन्व्हेस्टिंगेशन ऑफ दी क्लेमस ऑफ दी परानॉर्मल, ' या संस्थेने अशा अनेक भंपक दावेदारांचे पितळ उघडे पाडले आहे. 
बेहरा यांनी बघितलेला प्रकार हिस्टेरियाचा आहे. तो कालांतराने बरा होतो, असे मनोरोग चिकित्सक डॉ. राजेंद्र सारडा यांचे म्हणणे आहे. या प्रगत आधुनिक युगात काल्पनिक, असित्वहीन भूत याचा दावा करणे शहाणपणाचे नाही, भूत असेल तर ते सिद्ध करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी केले आहे.